साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या २०२३ च्या कॅलेंडर अंतर्गत तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशान्वये रविवारी, १५ ऑक्टोबर रोजी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, चाळीसगाव येथे तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगाव न्यायालयातील कौटुंबिक प्रलंबित प्रकरणांकरीता विशेष लोकन्यायालयाचे आयोजन केले होते. विशेष लोकन्यायालयात चाळीसगाव न्यायालयात ठेवलेल्या १३८ पैकी ७ कौटुंबिक प्रकरणे निकाली काढण्यात आले. विशेषतः कौटुंबिक प्रकरणातील तीन वैवाहिक जोडप्यांनी नव्याने नांदावयास सुरुवात केली.
विशेष लोकन्यायालयाचे कामकाज तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्या.एन. के. वाळके, वकील संघाचे सहसचिव ॲड. बी.आर.पाटील, पॅनल मेंबर्स ॲड. संग्रामसिंग शिंदे, वकील संघाचे सदस्य ॲड. भागवत पाटील, ॲड. पी.एस.एरंडे, ॲड. संतोष डी. पाटील, ॲड. पी.बी.आगोणे, ॲड. एस.एस.बोरसे, ॲड. निलेश निकम, ॲड. अनिल दराडे, ॲड. संदीप परदेशी, ॲड. आर.डी.जगताप, ॲड. डी.डी.दसेगावकर, ॲड. योगिता निकुंभ, ॲड. सागर पाटील, ॲड. ज्योती धर्माणी, ॲड. अतुल कापसे, ॲड. प्रेमनाथ निकम, पी.एल.व्ही. देवेश पवार, न्यायालयीन कर्मचारी संदीप पाटील, डी.के. पवार, डी. टी. कुऱ्हाडे, राकेश तिरमल, तुषार भावसार, किशोर पाटील यांनी पूर्ण केले.