चाळीसगावला शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी किरण आढाव

0
32

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

शहरात सालाबादप्रमाणे तिथीनुसार यंदाही २८ मार्च २०२४ रोजी शिवसेना उबाठातर्फे शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. शिवजयंतीच्या नियोजनासाठी येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना उबाठाचे जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुका प्रमुख रमेश चव्हाण, शहर प्रमुख नाना कुमावत, विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी, १३ मार्च रोजी बैठक घेण्यात आली. बैठकीत शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी किरण आढाव यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

उर्वरित कार्यकारिणीत उपप्रमुखपदी चेतन कुमावत, हेमंत साळकर, सचिवपदी जितेंद्र (रॉकी) धामणे, सहसचिवपदी चेतन आढाव, ऋषिकेश देवरे, खजिनदार भिमराव खलाणे, सहखजिनदार महेंद्र जयस्वाल यांचा निवडीत समावेश आहे. बैठकीत सर्वांनी मिळून खूप मोठ्या जल्लोषात चाळीसगाव शहरातील सर्वात मोठी जयंती मिरवणूक काढण्याचे ठरविण्यात आले.

बैठकीला दिलीप घोरपडे, शैलेंद्र सातपुते, रामेश्‍वर चौधरी, राजु भालेराव, चंद्रकांत नागणे, सुनील गायकवाड, रघुनाथ कोळी, प्रशांत कुमावत, राजेंद्र कुमावत, सुरेश पाटील, हर्षल माळी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here