साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या समाजकल्याण विभागाकडून प्रादेशिक उपायुक्त नाशिक विभाग, नाशिक यांच्यावतीने आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संकल्पनेतून अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या नाशिक विभागातील विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन अहमदनगर येथे २८ ऑक्टोबर रोजी केले होते. स्पर्धेत मुलांची शासकीय निवासी शाळा, चाळीसगाव संघाने प्रत्येक सामन्यात वर्चस्व ठेऊन चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात हा संघ १-० ने विजेता ठरला आहे.
अध्यक्षस्थानी समाजकल्याण प्रादेशिकचे उपायुक्त माधव वाघ होते. स्पर्धेची सुरुवात फ्लँग मार्च आणि क्रीडा ज्योतने झाली. स्पर्धेत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, धुळे या ५ जिल्ह्यातील ७ संघानी सहभाग घेतला होता. सामन्यांमध्ये मुलांची शासकीय निवासी शाळा, चाळीसगाव संघाने प्रत्येक सामन्यात वर्चस्व ठेऊन चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात हा संघ १-० ने विजेता ठरला तर मुलांची शासकीय निवासी शाळा, जि.अहमदनगर संघास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेतील विजेता, उपविजेत्या संघांना माधव वाघ, राधाकिशन देवढे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. मुलांची शासकीय निवासी शाळा, चाळीसगाव येथील विद्यार्थी गौरव बापूराव वाघ हा सर्व स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरला. स्पर्धेतील विजेता संघासाठी सहायक आयुक्त योगेश पाटील यांच्या मार्गदर्नाखाली गृहपाल दिलीप परदेशी, तालुका समन्वयक अनिल पगारे, प्रशिक्षक कल्पेश मोरे यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
यशस्वी खेळाडुंचे कौतुक
शासकीय निवासी शाळेतील मुलांनी मिळविलेल्या यशाचे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रभारी गृहपाल दिलीप परदेशी, मुख्याध्यापिका वनिता बेरड, तालुका समन्वयक अनिल पगारे, प्रशिक्षक कल्पेश मोरे, संघाचा कर्णधार भावेश अहिरे, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू गौरव मोरे आणि संघाचे तसेच महेंद्र कुमावत, ज्ञानेश्वर लिंगायत, सोनाली महाजन, रुपाली सोनवणे, श्रीमती तडवी, श्री.कोठावदे, संभाजी पाटील यांचे कौतुक केले आहे.