साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील कोतकर कॉलेजपासून रविवारी, २८ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता पोलीस मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेत मोठ्या संख्येने नागरिकांनी भाग घ्यावा, असे आव्हान पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.
एक धाव व्यसनमुक्तीसाठी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत महाराष्ट्राचे ट्रिपल केसरी पहेलवान व पोलीस अधिकारी विजय चौधरी मोहिमेत सहभागी होणार आहे.
मोहिमेसाठी जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, पोलीस उप अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपविभागीय अधिकारी अभयसिंग देशमुख, चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले, योगेश माळी बिरारी, गोपनीय विभागाचे पंढरीनाथ पवार, भटू पाटील यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहे.