पत्रकार परिषदेत समाज मंडळाचे अध्यक्ष शरद मोराणकर यांची माहिती
साईमत।चाळीसगाव।प्रतिनिधी।
अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाचा महामेळावा रविवारी, २२ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता येथील मालेगाव रस्त्यावरील विशाल वंदन नगर येथे आयोजित केला असल्याची माहिती समाज मंडळाचे अध्यक्ष शरद मोराणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सचिव सी.सी.वाणी, सतीश पाटे, भिकन वाणी, अशोक बागड, डॉ.संतोष मालपुरे, संदेश येवले, अमोल नानकर, संजय ब्राह्मणकार, पंकज पिंगळे, चंद्रकांत पाखले, निलेश वाणी, महेश येवले, भावेश कोठावदे, सतीश येवले, गणेश बागड, स्वप्नील धामणे, अनिल कुडे, सागर मेखे, यश चिंचोले, कल्पेश मालपुरे, मनोज चिंचोले आदी उपस्थित होते.
मेळाव्यासाठी राज्यस्तरीय ज्येष्ठ नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याचे अमोल नानकर, सतीश पाटे यांनी माहिती दिली. समाजाचे इतर समाजातील सर्वांशी सलोख्याचे, सामंजस्याचे संबंध आहेत. समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सहकार, धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात भरीव योगदान आहे. परंतु राजकीय क्षेत्रात समाजास कुठेही प्रतिनिधीत्व दिले जात नाही अथवा मिळत नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. म्हणून समाजाची एकजुट ताकद सक्षमता फार मोठ्या प्रमाणात आहे. हे राजकीय धुरंधरांना लक्षात आणण्यासाठी चाळीसगाव लाडशाखीय वाणी समाज, यांच्यावतीने महामेळाव्याचे आयोजन केले आहे.
विधानसभा २०२४ च्या पंचवार्षिक निवडणुका पुढील दोन-तीन महिन्यात येऊ घातलेल्या आहेत. ह्या निवडणुकीत लाडशाखीय वाणी समाजाला सक्षम जागी प्रतिनिधीत्व मिळण्याबाबत महामेळ्याचे आयोजन केले आहे. राज्यातील लाडशाखीय वाणी समाजाच्या एकजुटीची वज्रमुठ, सामर्थ्यशक्ती ह्या ऐतिहासिक मेळाव्यातून प्रदर्शित केली जाणार आहे. समाजाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे.महामेळाव्यास कोणत्याही राजकीय पक्षाचे, व्यक्तीचे पाठबळ नाही फक्त समाजाचे ऐक्य दाखविणे हे अभिप्रेत आहे. समाज स्वबळावरच हा मेळावा यशस्वी करुन दाखविणार आहे. ह्या सामाजिक महामेळाव्यासाठी राज्यातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील सर्व समाज बंधू-भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन मेळावा समितीने केले आहे. पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन डॉ.संतोष मालपुरे यांनी केले.
यांची राहणार मार्गदर्शनासाठी उपस्थिती
मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास वाणी (पुणे), धीरज येवले (चाळीसगाव) राष्ट्रीय सचिव राजेश कोठावदे (नाशिक), राष्ट्रीय उपाध्यक्ष आर. एल. वाणी (मुंबई), गजानन मालपुरे (जळगाव), राजेंद्र पाचपुते (धुळे), गोविंद शिरोळे (पारोळा), गोपालराव केले (धुळे), शशिभाऊ येवले (भडगाव), डॉ. शशिकांत वाणी (तळोंदा), शरद पाटे (पाचोरा), रमेश वाणी (पाचोरा), राजेंद्र चितोडकर (धुळे), अनिल नागमोती (धुळे), विनोद दशपुते (नाशिक), शाम कोतकर (पुणे), कल्पेश दुसे (गुजराथी), श्रीधर कोठावदे (कळवण), प्रवीण अलई (नाशिक), मनोज ब्राह्मणकार (पुणे), चाळीसगाव समाज अध्यक्ष शरद मोराणकर, सचिव सी. सी. वाणी आदी उपस्थित राहणार आहेत.
यशस्वीतेसाठी समाजबांधव घेताहेत परिश्रम
यशस्वीतेसाठी संदेश येवले, अशोक बागड, सतिश पाटे, निलेश वाणी, अमोल नानकर, अनिलबापू शिनकर, अनिल कोतकर, भावेश कोठावदे, डॉ. संतोष मालपुरे, भिकन वाणी, पंकज पिंगळे, डॉ. महेश वाणी, चंद्रकांत पाखले, महेश येवले, सतिष देव, अमोल अमृतकर, योगेश येवले, कल्पना पाखले, वैशाली येवले, वर्षा पिंगळे, योगेश शिरुडे, दिनकर पाखले, सचिन पाखले, संजय ब्राह्मणकार, सचिन पाखले, प्रदीप पिंगळे, गणेश बागड, मनोज चिंचोले आदी असंख्य समाजबांधव परिश्रम घेत आहे.
अशा असतील समाजाच्या प्रमुख मागण्या
महामेळाव्यात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सक्षम जागी तसेच राज्यपाल नियुक्त विधानपरिषद व पुढील राजकीय क्षेत्रात प्रतिनिधीत्व मिळण्याबाबत. सोळा कुलस्वामिनी नावाने आर्थिक महामंडळ. गरजू विद्यार्थ्यांसाठी मुंबई, पुणे, नाशिक येथे विद्यार्थी वसतीगृह. वाणी समाजाच्या लोकप्रतिनिधींचा महामंडळांवरील विविध पदांवर नियुक्ती करणे अशा प्रमुख मागण्यांचा समावेश असणार आहे.