बालकांच्या आहाराविषयी तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी
एकात्मिक बालविकास प्रकल्प दक्षिण जळगाव चाळीसगाव पाचोरा बीट क्रमांक १ अंतर्गत चाळीसगाव येथे राष्ट्रीय पोषण आहार अभियान हा कार्यक्रम अंगणवाडी प्रभागात नुकताच राबविण्यात आला. त्याची सांगता चौधरी वाडा येथे करण्यात आली. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे नगरपालिका दवाखान्यातील डॉ.अनुराधा खैरनार, माजी नगरसेविका विमलबाई चौधरी उपस्थित होते. तसेच बीटमधील अंगणवाडी सेविका, मदतनीस, परिसरातील इतर सदस्य उपस्थित होते
यावेळी डॉ. अनुराधा खैरनार यांनी आहाराचे महत्व सांगितले. तसेच काळाबरोबर आहारातील कसा बदल करावा, बालकांना आहार त्याच्या आवडीनुसार कसा करून घ्यावा, तशी आहाराची पद्धत कशी बदल करावी, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. विमलबाई चौधरी यांनी आहार व बाळाचे एक हजार दिवस बाळाची दोन वर्षापर्यंत काळजी कशी घ्यावी बाळाला आईच्या दुधाबरोबर आहाराचे काय महत्व. मुलांना आहारात बदल करून कसा खाऊ घालावा. शक्तीवर्धक, ऊर्जा वर्धक संरक्षणात्मक यावर मार्गदर्शन केले. गरोदर माता, स्तनदामाता यांना मार्गदर्शन करण्यात आले
कार्यक्रमात विविध प्रकारचा पोषण आहार आधारित रांगोळ्या पूर्व प्राथमिक आहार प्रात्यक्षिक विविध बॅनर ठेवण्यात आले होते. गरोदर माता बेबी किट प्रमुख पाहुणे पाहुण्यांनी पाहणी करून आहाराची चव घेतली. कार्यक्रमासाठी कांचन गुरव, आशा चौधरी, भारती चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यासाठी सर्व सेविका, मदतनीस यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन छाया भामरे यांनी केले



