चाळीसगाव महाविद्यालयात संगणक विभागात पोस्टर प्रदर्शन स्पर्धा उत्साहात

0
36

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित बी.पी. आर्ट्‌स, एस.एम.ए सायन्स, के.के.सी. कॉमर्स कॉलेजतर्फे आयोजित संगणकशास्त्र विषयातंर्गत पोस्टरसह मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत ५० पोस्टरसह १० मॉडेलचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपप्राचार्य डॉ. अजय काटे, प्रा.दीपक आवटे, डॉ.योगिनी वाघ आदी उपस्थित होते.

स्पर्धेत विद्यार्थ्यांनी संगणक विषयाचे विविध भागांचे व संगणक भाषेचे पोस्टर व मॉडेल प्रेझेंटेशनच्या सहाय्याने सुंदर सादरीकरण केले. स्पर्धेत एफ. वाय., एस. वाय. आणि टी. वाय. बी. एस्सी.च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांनी विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेल्या पोस्टर आणि मॉडेल प्रेझेंटेशनच्या बाबतीत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. स्पर्धेत उत्कृष्ठ पोस्टर आणि मॉडेल यांना प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. परीक्षक म्हणून राष्ट्रीय महाविद्यालयाचे डॉ.के. सी. देशमुख यांनी काम पाहिले.

पारितोषिक मिळणाऱ्यांमध्ये एफ. वाय. बी. एस्सी.ची वैष्णवी पाटील प्रथम, द्वितीय निखिल शर्मा, तृतीय राजश्री नागरे, एस.वाय.बी.एस्सी.तील भाग्यश्री पाटील प्रथम, द्वितीय कोमल ठाकरे, तृतीय शेख माहीम तर टी. वाय. बी. एस्सी.तील साक्षी गढरीया प्रथम, द्वितीय मैत्रीय पाटील, तृतीय लिलेश्वर महाजन यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. दीपक आवटे यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा. हर्षा मोरे, प्रा. यामिनी पाटील, निकिता शिरोडे, प्रा. माधुरी देशमुख, सौरभ त्रिभुवन, शुभम पाटील आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक डॉ. योगिनी वाघ तर सूत्रसंचालन प्रा. रश्मी साळुंखे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here