पोलिसांचा नागरिकांसाठी ‘चाळीसगाव शहर – रात्र गस्त’ उपक्रम

0
14

साईमत/ न्यूज नेटवर्क/ चाळीसगाव :

शहरात पोलिसांकडून चोरट्यांवर पायबंद घालण्यासाठी ‘चाळीसगाव शहर – रात्र गस्त’ असा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. यासाठी नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स आणि सूचना देऊन नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन चाळीसगाव शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले आहे.

पोलिसांतर्फे ‘चाळीसगाव शहर – रात्र गस्त’ उपक्रमामुळे रात्री ५ मोटरसायकलवर १० कर्मचारी, पिटर मोबाईल १, गुन्हे शोध पथक मोबाईल १ असे शहरात गस्तकामी नेमण्यात आली आहेत. रात्री गस्त दरम्यान पोलिसांना विविध अनुभव आल्याने नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याने त्याचा चोरटे फायदा घेत आहे. त्यामुळे चोऱ्यांच्या घटना घडत आहेत. यासाठी पोलिसांतर्फे काही महत्त्वाच्या टिप्स आणि सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यात काही कॉलनी परिसरात कोणीही घराचा बाहेरचा एकही लाईट लावत नाहीत. त्यामुळे सर्वत्र अंधार असतो.त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नाही. त्याचाच फायदा चोरांना होतो. बहुतांश लोक घराचा दरवाजा उघडा करून झोपतात. चोर शेजारी दरवाजा तोडतो आहे तसा आवाज पण शेजारी ऐकतो पण पोलिसांना कॉल करत नाहीत. असे असल्यास डायल ११२ ला कॉल करावा किंवा पोलीस स्टेशन ०२५८९-२२२०७७ वर संपर्क साधावा. कॉलनी परिसर मिळून निदान कॉलनी चौकात चांगल्या क्वालिटीचे सीसीटीव्ही कॅमेरे लोकवर्गणीतून लावून घ्यावेत. बाहेरगावी जाताना शेजारी कल्पना द्यावी किंवा नातेवाईकांना घराकडे लक्ष देण्यास सांगावे. यासाठी एक जागृत नागरिक म्हणून कधीतरी रात्री उठून आपणच आपल्या घराचा परिसर तपासत रहावा, अशा महत्त्वाच्या सूचना पोलिसांनी केल्या आहे.

चिमुकल्यांकडे लक्ष देण्याची गरज

बेरोजगारी, दुष्काळ, काम न करण्याची युवकांची वृत्ती, झटपट श्रीमंतीचा हव्यास हा चोरी करण्यास प्रवृत्त करतो. त्यामुळे लहान मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. चोरी करणे गैर असून अशी सवय वाईट आहे, असे बालकांना शिक्षण देण्याची गरज आहे. चांगला आदर्श त्यांच्यासमोर आणून अभ्यासात लक्ष, कष्ट करण्याची सवय त्यांच्यात जडावी, यावर पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याची अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here