चाळीसगावला ईद मिलादुनबी उत्साहात साजरी

0
41

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर साहब यांची जयंती ईदमिलादुनब्बी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी हुडको परिसर, मदिना मशीद, जामा मशीद, अक्सा मशीद, गौसिया मशिद, फातेमा मशीद, कादरी नगर, अक्सा नगर, बाराभाई मोहल्ला, नागद रोड, जहागिरदार नगर, कुरेशी मोहल्ला, इस्लामपूरा, हजरत अली चौक, न.पा.मंगल कार्यालय आदी भागातून मुस्लिम बांधवांनी वाजत-गाजत मिरवणूक काढून शरबत व मिठाई वितरित केली. यावेळी मुस्लिम समाजातील आबालवृद्ध बहुसंख्येने उपस्थित होते.

चाळीसगाव शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक तुषार देवरे, सहायक निरीक्षक विशाल टकले, सागर ढिकले, दीपक बिरारी, उपनिरीक्षक योगेश माळी, पंढरीनाथ पवार, भटू पाटील यांनी सहकाऱ्यांसह चोख बंदोबस्त ठेवला होता. सजविलेल्या वाहनांवरुन विविध प्रभागातील मिरवणूक घाट रस्त्यावरुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, जुनी नगरपालिका, सराफ बाजार, टाऊन हॉल, पाटणादेवी रोड मार्गे हजरत पीर मुसा कादरी बाबा दरगाह येथे पोहचून दुआ पठण होऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली. शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here