Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Nashik : चैत्र पौर्णिमेसाठी सप्तशृंगगडावर एसटीची भव्य तयारी; २५० बसेस सज्ज
    जळगाव

    Nashik : चैत्र पौर्णिमेसाठी सप्तशृंगगडावर एसटीची भव्य तयारी; २५० बसेस सज्ज

    saimatBy saimatMarch 28, 2026Updated:March 28, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / नाशिक / प्रतिनिधी

    चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त सप्तशृंगगड येथे होणाऱ्या यात्रेसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने व्यापक नियोजन केले असून, एकूण २५० जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी निमाणी बसस्थानकातून दर १५ मिनिटांनी, तर नांदुरी पायथ्यापासून दर ५ मिनिटांनी गडाकडे बस सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे.

    उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक या धार्मिक सोहळ्यासाठी गडावर येत असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी महामंडळाने विशेष व्यवस्था केली आहे. ३ एप्रिलपर्यंत ही अतिरिक्त बससेवा सुरू राहणार असून, निमाणी, नांदुरी पायथा आणि गड वाहनतळ येथे यात्रा वाहतूक केंद्र उभारण्यात आले आहे. तसेच मालेगाव, मनमाड, सटाणा आणि नांदगाव येथूनही जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

    गडासाठी बस नियोजन :
    नांदुरी – १२०
    मालेगाव – ४५
    मनमाड – १५
    निमाणी – ६५
    सटाणा – ०५

    यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अल्पदरात निवास व्यवस्था, शिवालय तीर्थ येथे मोठे निवारा मंडप, ई-टॉयलेट, पाणपोई तसेच चप्पल स्टँडची सोय करण्यात आली आहे. अखंड वीजपुरवठ्यासाठी तीन जनरेटरची व्यवस्था करण्यात आली असून, गड परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हंगामी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

    यात्रेच्या कालावधीत (२६ मार्च ते ३ एप्रिल) गडावर खासगी वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली असून, नांदुरी येथून केवळ एसटी बसद्वारेच भाविकांची ने-आण केली जात आहे. गडापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Bodwad : बोदवडमधील अरिहंत जिनिंगला भीषण आग; लाखो रुपयांचा कापूस जळून खाक

    March 28, 2026

    Amalner : गावठी कट्ट्याचा घातक खेळ मित्रासमोरच सुटलेल्या गोळीने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

    March 28, 2026

    Stock Market Holiday : सुट्ट्यांचा शेअर बाजारावर परिणाम; पुढील आठवड्यात NSE-BSE चार दिवस बंद

    March 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.