पाळधी पोलिसांना पोलीस अधीक्षकांकडून प्रशस्तीपत्रक

0
25

साईमत, पाळधी, ता. धरणगाव : वार्ताहर

येथील पोलीस चौकीतील अधिकारी आणि कर्मचारी यांना चांगल्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक यांच्याकडून प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

बहिणाबाई चौधरी विद्यापीठ येथे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी योगेश रामा वळवी हा जेवण करून रूमवर जात असताना गेटजवळ त्याला फोन आला. तो मोबाईलवर बोलत असताना धूम स्टाईलने तीन जण मोटारसायकलवर आले. त्यांनी त्याचा मोबाईल लांबविला. यावेळी त्याने पाठलाग केला. मात्र ते पळून गेले. याबाबत त्याने तात्काळ पाळधी पोलीस चौकी येथे धाव घेऊन माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन सीसीटीव्हीद्वारे शोध घेवून त्यांना पकडून त्या विद्यार्थ्याला मोबाईल मिळवून दिला.

याबाबत येथील स. पो. नि.सचिन शिरसाठ, गजानन महाजन, ज्ञानेश्‍वर बाविस्कर, प्रदीप सोनवणे, वसंत निकम यांना पोलीस अधीक्षक डॉ.महेश्‍वर रेड्डी यांनी प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here