जि.प.चे सीईओ अंकित यांनी केली उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी

0
38

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे यांची तपासणी करून औषधी, यंत्र सामुग्री तसेच वैद्यकीय कर्मचारी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याबाबतची खातरजमा करणे तथा जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा सुस्थितीत आहेत याची खात्री करणे, विशेषतः नवजात अर्भक व बालके यांचे आरोग्याबाबत दक्षता घेणे, ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय, प्रा.आ.केंद्रे, उपकेंद्रे यांना नियमितपणे भेटी देऊन येणाऱ्या अडचणी स्थानिक स्तरावर उपलब्ध निधीचा विनियोग करण्याबाबत कार्यवाहीसाठी तसेच सर्व रुग्णालय अंतर्गत स्वच्छता व स्वच्छ पिण्याचे पाणी याची दक्षता घेऊन त्याप्रमाणे स्थानिक पातळीवर काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या सूचना असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, कुष्ठरोग जळगावचे सहाय्यक संचालक डॉ. जयवंत मोरे यांनी चोपडा उपजिल्हा रूग्णालय येथे नुकतीच भेट देऊन कामकाजाची तपासणी करुन पाहणी केली.

सीईओ अंकित यांनी रुग्णालयात उपलब्ध औषधीसाठा, तातडीच्या औषधी खरेदीबाबत, आवश्यक मनुष्यबळ, रुग्णालयाअंतर्गत व परिसरातील स्वच्छता, अर्भक, बालमृत्यू, मातामृत्यू, संस्थात्मक होत असलेल्या प्रसूती, NCD, सांसर्गिक व असांसर्गिक आजार, पिण्याचे पाणी, आदी सर्व आरोग्याच्या सुविधांचा त्यांनी सखोलपणे आढावा घेतला. त्याचप्रमाणे रुग्णालयातील काही उणिवा व त्रुटींची पूर्तता करण्यासंदर्भात आवश्यक अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच प्रशासनामार्फत रूग्णालयासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात येईल, याबाबत त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी आणि अधीक्षकांसह सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना आश्वस्त केले.

शाल अन्‌‍ पुस्तक भेट देऊन सत्कार

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लासुरकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांचे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि डॉ.जयवंत मोरे यांचे शाल आणि पुस्तक भेट देऊन सत्कार केला. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर, चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुरेश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज पाटील, डॉ. सागर पाटील, डॉ. निलिमा देशमुख, डॉ. तृप्ती पाटील, डॉ. स्वप्ना पाटील यासोबतच जिल्हा पर्यवेक्षक विजय देशमुख, तालुका हिवताप पर्यवेक्षक जगदीश बाविस्कर, दिलवरसिंग वडवी, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक किशोर सेंदाणे, कमलेश बडगुजर, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी वर्ग, तथा उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here