शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने पटकावला प्रथम क्रमांक
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) आणि टेन एआय कन्सल्टिंग प्रा. लि. यांच्या सामंजस्य करारातंर्गंत प्रोग्रामर डे स्पेशल “टेन एआय हॅकेथॉन” एकदिवसीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालय, एम. जे. कॉलेज, केसीई आयएमआर कॉलेज, केसीई इंजिनिअरिंग कॉलेज, रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेज, राष्ट्रीय कॉलेज, चाळीसगाव तसेच गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज व गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कॉलेज, जळगाव येथील १७ संघांचे १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रत्येक संघाला प्रोजेक्ट कल्पना तयार करण्यासह सादरीकरणासाठी ठराविक वेळ देण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रमोद तायडे, उपप्राचार्य प्रा. डॉ. सत्यजित साळवे, आर्य चांदोरकर, स्वरदा ओगले (टेन एआय) यांच्या हस्ते झाले.
पहिल्या सत्रात आर्य चांदोरकर, स्वरदा ओगले यांनी प्रोजेक्ट प्रेझेंटेशनबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रत्येक संघाने प्रोजेक्ट आयडिया मांडणी, प्रात्यक्षिक व सादरीकरण केले. परीक्षक म्हणून एम. जे. कॉलेजच्या डॉ. लीना भोळे, बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या डॉ. मोनाली खाचणे उपस्थित होत्या. मेंटीमीटर अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन गुणांकन करण्यात आले. स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, प्रभारी प्राचार्य व्ही. जे. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संगणक शास्त्र विभागातील प्रा. वैशाली विसपुते, प्रा. अश्विनी देपूरा, प्रा. सायली पाटील, चेतन सोनवणे, निळकंठ बोरोले, मिलिंद पाटील यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. हर्षाली पाटील तर सूत्रसंचालन तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी केले.
विजेत्यांचा सन्मान
विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांक–गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, त्यातील नेहा भोसले, पूर्वा भागवत, साक्षी चौधरी, रिया नेहते, आरोही वर्दीकर, सुचिता येवले, द्वितीय–एम. जे. कॉलेज, त्यातील मंजू दिनेश चौधरी, तेजस प्रभाकर रामटेके, अनिकेत अर्जुन बारी, चिरायू उमेश तिवारी, चंदन मुकेश शिंपी, विकी किरण पाटील, तृतीय–गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कॉलेज, त्यातील तुप्ती रवींद्र बोरसे, राजेश्वरी रणधीर घुगे, दिशा सुनील दैवत, वैष्णवी विनोद इखे, कृष्णा गणेश सोनवणे, दर्शन महेश फुलपगारे यांचा समावेश आहे. विजेत्या संघांना स्मृतीचिन्हास प्रमाणपत्र प्रदान करुन सन्मान करण्यात आला.
