साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून ग्रंथालयात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी दिलीप सोनवणे होते. प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून अमळनेर पो.स्टे.चे पीएसआय अनिल भुसारे, से.नि.प्रशासन अधिकारी नगरपालिका प्रमुख भाऊसाहेब देशमुख, मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष राजू महाले, हेमंत भांडारकर आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी डॉ.कलाम यांचे विचार देशाला महासत्तेकडे नेतील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी डॉ.कलाम यांचे विचार आत्मसात केले पाहिजे, असे सांगितले. वाचनालयाच्या उपाध्यक्षा माधुरी भांडारकर, सचिव प्रकाश वाघ, संचालक भिमराव जाधव यांच्यासह ग्रंथालयीन कर्मचारी, विद्यार्थी, वाचकवर्ग उपस्थित होते. सुत्रसंचालन स्पर्धा परीक्षेचे संचालक विजय पवार यांनी केले.