साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी
भडगाव येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिना निमित्त भडगांव येथील छत्रपती संभाजी महाराज सभागृह येथे आज दि.६ रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा व व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल तहसिलदार मुकेश हिवाळे, मुख्याधिकारी रवींद्र लांडे,कृषी अधिकारी बी.बी.गोर्डे, महिला दक्षता समिती अध्यक्ष योजनाताई पाटील, यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल व तहसिलदार मुकेश हिवाळे यांनी ग्रामीण पत्रकार संघाच्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यानंतर पंकज रणदिवे यांचे महापुरुषांच्या विचारातून काय घ्यावे या विषयावर जाहीर व्याख्यानचा कार्यक्रम घेण्यात आला.
पंकज रणदिवे यांनी आपल्या व्याख्यानातून आलेल्या प्रमुख मान्यवरांचे तसेच पत्रकार बांधव तसेच व उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांचे आपल्या व्याख्यानातून महापुरुषांबद्दल असलेले विचार, व त्यांच्या बद्दल असलेले मत, व जातिभेदांमध्ये विभाजले गेलेले महापुरुष यांच्या विषयी महापुरुष हे एकाच जातीला धरून चालत नसे ते आपल्या सर्व कार्यात सर्व समभाव बांधत्व या विचारांना घेऊन आपले कार्य करत असे यामुळेते महापुरुष आहेत. आणि आपण फक्त आणि फक्त जातीभेदच करून जातीच्या नावाखाली या महापुरुषांना वाटून घेतले आहे. असे न करता सर्व महापुरुष आपलेच आहेत. असे विचार आपण आपल्या मनात डोक्यात आणावेत असे या व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांनी मान्यवरांना पटवून दिले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष योजनाताई पाटील, इम्रान अली सय्यद, गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, तालुका वैद्यकीय अधिकारी सुचिता आकडे, कजगाव वैद्यकीय अधिकारी प्रशांत पाटील, माऊली फाउंडेशन अध्यक्ष युवराज सूर्यवंशी,भूषण पाटील, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष भानुदास महाजन, भडगाव शहराध्यक्ष निलेश महाले, कजगाव शहराध्यक्ष आमिन पिंजारी, तालुका उपाध्यक्ष अमीन शाह, प्रवीण पाटील, संजय महाजन, डॉ.बी.बी. भोसले, भाऊसाहेब सूर्यवंशी,नाना पाटील, गणेश रावळ, निलेश पाटील, गुलाब नेरपगार, समाधान पाटील, शैलेश पाटील, यांच्यासह मोठ्या प्रमाणात मान्यवर यावेळी उपस्थित होते.