साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
माणूस म्हणून जन्माला आल्यावर आपण ज्या समाजात राहतो त्याचे काहीतरी देणे लागतो हे भान लक्षात घेत येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल ॲड ज्यू कॉलेजचे विज्ञान शिक्षक संजय पाटील यांनी आपला चिरंजीव चिरायूचा दुसरा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. आर्मी स्कूलमधील पितृछत्र आणि मातृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी स्वखर्चाने नोटबुकसह पेनचे वाटप करुन त्यांना मदतीचा हात दिला आहे. अशा अनोख्या वाढदिवसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विजय नाना पाटील आर्मी स्कूलचे प्राचार्य पी एम.कोळी, ज्येष्ठ शिक्षक व्ही.जी.बोरसे, वाय.वाय.पाटील, शरद पाटील, व्ही.डी.पाटील यांच्या हस्ते २६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आर्मी स्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.