साईमत, रावेर : प्रतिनिधी
आगामी ईद आणि येणारे सण सर्व धर्मीय लोकांनी शांततेत साजरे करावे. समाजात शांतता भंग करणाऱ्यांची नावे पोलीस प्रशासनाला कळवावे. कायदा सुव्यवस्था निर्माण होईल, असे कोणतेही काम कोणीही करू नये, असे अवाहन आयपीएस तथा पोलीस उप विभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांनी केले. रावेर पोलीस स्टेशनतर्फे आयोजित सामाजिक एकता सर्वधर्म समभाव इफ्तार पार्टीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी मौलाना गयासुद्दीन, मौलाना नजर यांनी रमजान महिन्याबद्दल माहिती दिली. आगामी ईद व सण दरम्यान आयोजित मिरवणुकीवर वायफळ खर्च करण्यापेक्षा गरजु विद्यार्थ्यांना पुस्तके घेऊन द्यावे, समाजोपयोगी विधायक कामे करण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.प्रदीप जयस्वाल यांनी आवाहन केले.
इफ्तार पार्टीला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष महेमुद शेख असदुल्लाह खान, शेख गयास, शेख सफुद्दीन, यूसुफ खान, शेख रफिक, अय्यूब मेंबर, शेख शफी, माजी नगराध्यक्ष हरिष गनवाणी, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपाचे शहराध्यक्ष दिलीप पाटील, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर महाजन, माजी शहराध्यक्ष उमेश महाजन, अरुण शिंदे, सुधाकर महाजन, दिलीप कांबळे, ई.जे.महाजन, भावलाल महाजन, सुधाकर नाईक, ॲड.योगेश गजरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पाटील, डी.डी.वाणी, अशोक गायकवाड उपस्थित होते. सूत्रसंचलन शेख रईस यांनी केले.