Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»Abhyasika Kendra in Vardi: वर्डीत अभ्यासिका केंद्राला पुस्तके भेट देऊन अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
    चोपडा

    Abhyasika Kendra in Vardi: वर्डीत अभ्यासिका केंद्राला पुस्तके भेट देऊन अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 2, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

    साईमत/चोपडा/प्रतिनिधी :

    येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंतीनिमित्त मिरवणूक पध्दत, वायफळ खर्च न करता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी वर्डीतील अभ्यासिका केंद्राला पुस्तके भेट देऊन अनोखा उपक्रम राबविण्यात आला. तसेच सर्व जाती-धर्माच्या समाजबांधवांना समाविष्ट करुन राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी पोलीस पाटील पद्माकर नाथ होते.प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती विनायक चव्हाण, माजी सभापती कांतीलाल पाटील, चोसाकाचे संचालक दिलीप नायदे, प्रभाकर नायदे, रायभान धनगर, सरपंच महेंद्र पाटील, प्रकाश धनगर, रवींद्र धनगर, सतिष शिरोळे, योगराज नायदे, रमेश धनगर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तसेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.

    यावेळी अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास तसेच प्रत्येक धर्म आणि जातीसाठी केलेली कामगिरी नागरिकांना सांगितली. गावातील स्पर्धा परीक्षा व नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना लागणारे जनरल नॉलेजचे तसेच स्पर्धा परीक्षेची पुस्तके अभ्यासिका केंद्राला भेट दिली. विविध क्षेत्रात नवनियुक्तपदी निवड झालेले तरुण-तरुणी वर्डी गावातील दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

    थोर पुरुषांच्या जयंतीलाही प्रथा सुरू ठेवावी

    कार्यक्रमाचे आयोजक समस्त धनगर समाजाने व्यर्थ जाणारा पैसा आपण गावातील तरुण विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी खर्च केला. यानिमित्त सर्व मान्यवरांनी धनगर समाजाचे कौतुक केले. अशीच गावातील प्रत्येक समाजाने आपल्या थोर पुरुषांच्या जयंतीलाही ही प्रथा सुरू ठेवावी, असे प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले.

    यांनी घेतले परिश्रम

    यशस्वीतेसाठी शाम नायदे, महारु सुलताने, लहुष नायदे, संदीप नायदे, सचिन धनगर, ईश्वर धनगर, विनोद नायदे, पंकज धनगर, जगदीश नायदे, सुरज नायदे, मोहीत धनगर, लोकेश धनगर, विशाल धनगर, गौरव धनगर, सौरव धनगर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी गावातील नागरिक, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक माजी सरपंच प्रदीप नायदे तर आभार भगवान नायदे यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chop : ट्रॅक्टर अपघातात बाप-लेकाची एकाच दिवसात शोकांतिका

    February 7, 2026

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026

    chop : माहेरी आलेल्या महिलेची विहिरीत उडी दोन मुलांसह मृत्यू

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.