साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगावमध्ये मत मोजणी नंतर ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन्स सुरक्षितरित्या ठेवण्यात आलेल्या त्या स्ट्रॉंग रूमचे CCTV काही वेळेसाठी बंद पडल्याने चांगलाच गोंधळ उडाला परंतु काही मिनिटातच परिस्थिस्ती पूर्वपदावर आली.
वीज पुरवठा खंडित झाल्याच्या कारणाने CCTV चे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद झाल्याचं प्रशासनाने सांगितलं. मात्र व्हिडीओ चित्रिकरण बंद पडल्यानंतर देखील सुरुच होते, असं प्रशासनान कडून सांगण्यात आले.
घडलेल्या या सर्व परिस्थितीची माहिती जिल्हाधिकारी यांनी सविस्तररित्या सांगितली, चार मिनिटांसाठी डिस्प्ले बंद होते, परंतु व्हिडीओ रेकॉर्डिंग ही सुरुच होती. या संदर्भात सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सर्व रेकॉर्डिंग दाखवण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीची तक्रार नाही. असा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले