साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :
शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने काल रात्री अटक केलेली आहे. त्यामध्येच आता त्यांच्यावर स्वप्ना पाटकर यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकोला पोलीस ठाण्यात राऊतांवर गुन्हा दाखल झाले असल्याचे समजत आहे. स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्या विरोधात धमकवल्याबाबतची तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी शनिवारी राऊतांवर एनसी दाखल करण्यात आली होती.
माहितीनुसार, किरीट सोमय्या यांनी काल पोलीस ठाण्यात जाऊन संजय राऊतांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी घातली होती. आणि त्यानंतर राऊतांवर ५०४ आणि ५०९ अन्वये एफआयआर दाखल करण्यात आली. काल त्यांना अंमलबजावणी संचलनालयने ताब्यात घेतले होते. काल तब्बल साडे नऊ तास चौकशी केल्यानंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले होते, आणि त्यानंतर त्यांना कार्यालयात नेण्यात आले.
आज संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीला ११ लाख ५० हजार रुपये मिळाल्याची देखील माहिती समोर आली आहे. याआधी संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी तीन वेळा समन्स बजावले होते; परंतु ते चौकशी साठी गैरहजर राहिले होते. त्यानंतर रविवारी सकाळी ईडी अधिकारी थेट त्यांच्या घरी चौकशी करिता पोहोचले होते. संजय राऊत यांना आज जे.जे रुग्णालयात तपासणीसाठी नेले जाणार आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले जाईल अशी माहिती मिळते आहे.