रायसोनी महाविद्यालयात “डिझाईन थिंकींग मेथोडोलॉजी द इंडियन वे” विषयावर कार्यशाळा
साईमत / जळगाव / प्रतिनिधी
कोणतीही गोष्टीची निर्मिती करण्याचा डीएनए खरे तर डिझाइनच असतो. तो आपल्याला त्याच समस्यांकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची, त्यावर उपाय शोधण्याची साधने देतो. गुंतागुंतीच्या समस्या छोटे छोटे भाग करून समजून घेणे हा डिझाइन थिंकिंगचा भाग आहे.
डिझाइन शिक्षण विद्यार्थ्यांना वास्तवाशी जोडते आणि त्यांना उपायांवर काम करण्यासाठी ज्ञान व अनुभव देते. आजही बहुतांश लोक डिझाइनला केवळ सौंदर्य शिल्प मानतात, पण डिझाइन थिंकिंग हे एक सामाजिक तंत्रज्ञान आहे, त्यामध्ये व्यावहारिक साधनांसह मानवी वर्तन समजून घेणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन व “अमाय डिझाईन सोल्युशन”चे संस्थापक तसेच सीईओ अभिषेक निरके यांनी केले.
एआईसीटीई एमओयु इस्टीट्यूट इनोव्हेशन कॉन्सिल आणि जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “डिझाईन थिंकींग मेथोडोलॉजी द इंडियन वे” या विषयावर “अमाय डिझाईन सोल्युशन”चे संस्थापक व सीईओ अभिषेक निरके यांची दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत उपस्थित होते.
कार्यशाळेच्या सुरुवातीस रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
अभिषेक निरके पुढे म्हणाले की, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आज आपण पर्यायांनी समृद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांपैकी एक आहोत. नवनवीन कल्पना आणि नवोन्मेष उद्योजकतेकडे नेण्याचे मार्ग खुले केले जात असल्याचे नमूद करत त्यांनी या कार्यशाळेत बहुसंख्य विध्यार्थ्याच्या मनातील शंकाचे निरसन केले
कार्यक्रमाचे समन्वय प्रा. डॉ. ज्योती जाखेटे यांनी साधले तसेच कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष सुनील रायसोनी यांनी अभिनंदन केले.