चौगाव-चुंचाळेचे तलाठी भूषण पाटील यांची बदली रद्द करा

0
34

चौगाव, चुंचाळे, लासूरच्या शेतकऱ्यांचे तहसिलदारांना निवेदन

साईमत/चोपडा/प्रतिनिधी:

तालुक्यातील चौगाव-चुंचाळे येथे कार्यरत तलाठी भूषण शांताराम पाटील हे गेल्या तीन वर्षापासून चौगाव-चुंचाळे सजेच्या ठिकाणी उत्कृष्ठ सेवा देत आहेत. अशातच नुकतीच त्यांची बदली चोपडा तालुक्यातील धुपे येथे केली आहे. त्यांचे कार्य अतिशय चांगले आहे. त्यामुळे त्यांची बदली रद्द करून त्यांना पूर्ववत चौगाव-चुंचाळे येथील सजेचा कार्यभार सोपवावा, अशी मागणी चौगाव, चुंचाळे व लासूर येथील शेकडो शेतकऱ्यांनी चोपड्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

तलाठी भूषण पाटील हे फक्त तलाठी नसून शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शक असल्याची भावना चौगाव येथील शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.निसर्ग आणि पर्यावरणाबाबत गेल्या तीन वर्षात त्यांचे चौगाव-चुंचाळे परिसरात मोठे योगदान राहिले आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार करून तलाठी भूषण पाटील यांची बदली रद्द करावी, अशी मागणी सर्वच स्तरावरून जोर धरु लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here