फोन करून केला मोबाईल हँग…सोयगावातील घटना…

0
22

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी

फोन पे कंपनीकडून बक्षीस लागल्याचे सांगून हिंदी भाषिक भामट्याने आरोग्य कर्मचाऱ्यास कॉल चालूच असतांना अवघ्या पाचच मिनिटात ४३ हजार,१२९ रु स गंडविल्याची घटना सोयगाव ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी उघडकीस आली याप्रकरणी आरोग्य कर्मचाऱ्याने औरंगाबाद येथील सायबर कॅफे विभागात दिलेल्या फिर्यादीवरून एका हिंदी भाषिक भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे सोयगावातील ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या मध्ये खळबळ उडाली आहे.

रविराज शेळके असे फसवणूक झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे नाव असून सोयगाव ग्रामीण रुग्णालयात ते दि.१३ कर्तव्यावर असतांना त्यांना सायंकाळी दीपक शर्मा या नावाने फोन पे कंपनीतून बोलतोय असे सांगून तुम्हाला कंपनीकडून ११९९ रु.चे बक्षिसासाठी पात्र असल्याचे सांगून फसवणूक दाराने कॉल वर नकार दर्शविताच त्यांनी आपणाला एक हजार ४२४ रु असा दंड आकारण्यात येईल असे सांगताच त्यांनी रविराज शेळके यांना बोलण्यात गुंग ठेवून चालू कॉल वरच त्यांच्या फोन पे च्या संलग्न असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र आणि ॲक्सिस बँक अशा दोन्ही बँकेतून दहा ट्रांझेक्षण द्वारे तब्बल ४३ हजार,१२९ रु अवघ्या पाचच मिनिटात चालू कॉल वरून रक्कम काढून फसवणूक करण्यात आली आहे.रविराज शेळके यांनी औरंगाबाद येथील सायबर मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून एका अज्ञात हिंदी भाषिक भामट्या विरुद्ध सायबर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित भामटा हा मुंबई(बी.के.सी) येथून बोलत असल्याचे सांगत असल्याचे फसवणूक झालेल्या रविराज शेळके यांनी फिर्यादीत नमूद केले आहे त्यामुळे सोयगाव पोलीस आणि सायबरचे एक पथक मुंबई कडे तपासासाठी रवाना झाल्याचे सोयगावचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी सांगितले या भामट्याने पाच मिनिटाच्या फोन कॉल मध्ये फसवणूक दाराचा मोबाईल हँग करून पूर्ण मोबाइल वर ताबा मिळविला होता संबंधित भामटा फसवणूकदाराचा फोन पे ऑनलाइन व्यवहाराची इत्यंभूत माहिती फसवणूक दारास देत होता हे विशेष! यामध्ये रविराज शेळके यांचे महाराष्ट्र बँकेच्या खात्यातून बारा हजार,४४ इतकी रक्कम तर ॲक्सिस बँक खात्यातून २९ हजार ८५ इतकी रक्कम पाच मिनिटात भामट्याने कपात केल्याचे रविराज शेळके यांना कॉल संपल्यावर आलेल्या संदेशावरून निदर्शनास आले.त्यामुळे फसवणूकदाराने तातडीने औरंगाबाद गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक(सायबर) घुगे,लोखंडे सीयगवचे पोलीस निरिक्षक अनमोल केदार पुढिल तपास करत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here