साईमत, जळगाव : प्रतिनिधी
येथील समस्त माळी समाजातर्फे वधू-वर सूचित नाव नोंदणी करण्यासाठी व माहिती पाठविण्यासाठी आवाहन केले आहे. डिसेंबर महिन्यात १० तारखेला जळगावात लेवा भवन येथे माळी समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्यात सूचीचे प्रकाशन होईल. माळी समाज राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे पोस्टर अनावरण नुकतेच करण्यात आले. यावेळी उद्योजक रितेश माळी, माळी बंधन संकेतस्थळाचे संचालक प्रशांत महाजन, उद्योजक संतोष इंगळे, नंदू पाटील, गोकुळ महाजन, विवेक महाजन, संकेत चौधरी, रोहित महाजन आदी उपस्थित होते.
माळी समाज राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा २०२३ हा १० डिसेंबर रोजी लेवा भवन येथे होणार आहे. त्यानिमित्त वधूवर परिचय सूची प्रकाशित होणार आहे. इच्छुक वधू व वरांनी नावे व माहिती ५ डिसेंबरपर्यंत माहिती पाठवायची आहे. नाव नोंदणीची माहिती malibandhan.com या संकेतस्थळावर किंवा ८२६१९८७१९३ व ७५८८८१३१६७ वर पाठवायची आहे. माहिती सिद्धेशा एनर्जी, नूतन महाविद्यालयाजवळ येथेही देता येणार आहे. संकेतस्थळ हे बुधवारी, १८ ऑक्टोबर रोजीपासून सायंकाळी सुरु केले आहे.