The Flag Of ‘MNS’ : बदलाची हाक : सिंधी कॉलनीतील तरुणांच्या हाती ‘मनसे’चा झेंडा 

0
10

राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर युवकांचा विश्वास

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

सिंधी कॉलनी परिसरातील उत्साही तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेत पक्षात जंगी प्रवेश केला. बदलाची आस, स्पष्ट नेतृत्व आणि शहरासाठी काम करण्याची प्रेरणा अशा तीन गोष्टींनी प्रभावित होऊन तरुणांनी मनसेची वाट निवडल्याचे सांगितले जात आहे.

राज ठाकरे यांच्या थेट, निर्भीड आणि युवकाभिमुख भूमिकेमुळे तरुणांमध्ये मनसेबद्दलचे आकर्षण वाढत असल्याचे स्पष्ट चित्र सिंधी कॉलनीत दिसून आले. प्रवेशप्रसंगी तरुणांनी शहरातील वाढत्या समस्या, वाहतूक अनुशासन, स्वच्छता आणि रोजगाराच्या संधी यावर ठोसपणे आवाज उठवणाऱ्या पक्षाच्या भूमिकेचे कौतुक केले. सिंधी कॉलनीच्या तरुणांनी “बदल हवा तर धाडस हवं आणि मनसेसोबत उभं राहणं म्हणजे बदलाच्या वाटेला सुरुवात” असा संदेश देत पक्षात सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या तरुणांच्या प्रवेशामुळे जळगावातील युवकांमध्ये मनसेची पकड अधिक मजबूत झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

यांनी केला प्रवेश

पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये लक्ष सोनवणे, योगा सोनवणे, कमलेश सोनवणे, मनवा धारा, कन्हैया राजपाल, विशाल राजपाल, किरण बागल, सागर नाथ, आकाश जोशी, विष्णू कटारिया, गौरव कटारिया, यश कवन, दीपक राठोड, साहिल ठाकूर, प्रतीक जोशी यांच्यासह इतर ४० तरुणांचा समावेश आहे. याप्रसंगी मनसेचे मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड.जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष तळेले, उपमहा नगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष रज्जाक सय्यद, सतीश सैंदाणे यांच्यासह मनसे सैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here