साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातील उर्दू लेखक, पत्रकार सईद पटेल यांच्या ‘सामने आईना है’ या कथासंग्रहाचे प्रकाशन मालेगाव येथील प्रसिद्ध लेखक शिक्षणतज्ञ अशफाक उमर यांच्या हस्ते खान्देश उर्दू कौन्सिलच्या संयुक्त विद्यमाने मेहरूण मधील ममता हॉस्पिटल जवळील टिक्की हॉल येथे रविवार ३ सप्टेंबर रोजी दुपारी २: ३० वाजता होत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार हे असतील तर उद्घाटक म्हणून मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड.जमील देशपांडे राहतील. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता खलील देशमुख,जमीयत उलेमा हिंदचे जिल्हाध्यक्ष व व्हायरल न्यूजचे संचालक मुफ्ती मुहम्मद हारून नदवी, मनीयार बिरादरी चे जिल्हाअध्यक्ष फारुख शेख, नगरसेवक इब्राहिम पटेल, नगरसेवक रियाज बागबान, शैक्षणिक विद्वान डॉ.बी.ए.पटेल सर,मुस्लिम कब्रस्तान आणि ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष वहाब मलिक, अल फैज फाउंडेशनचे अध्यक्ष अजीज सालार, बागबान फाऊंडेशनचे अध्यक्ष व संचालक युनिक उर्दू हायस्कूल मुहम्मद अशफाक बागबान, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव मुक्तदीर देशमुख, समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव रईस बागबान,कथा लेखक आणि माजी प्राचार्य सगीर अहमद, कथा लेखक आणि पत्रकार मुश्ताक करीमी, कथा लेखक व सेवानिवृत्त शिक्षक मोईनुद्दीन उस्मानी, कथा लेखक अनुवादक व सेवानिवृत्त शिक्षक रशीद कासमी, कवी व राज्य उर्दू साहित्य अकादमीचे माजी सदस्य अस्लम तन्वीर, जिल्हा परिषद शिक्षण केंद्राचे प्रमुख सेवानिवृत्त शिक्षक डॉ.शकील सईद, पत्रकार महंमद मुस्लिम कबीर लतूर, पत्रकार व वार्ताहर वसिक नवीद खामगाव, उर्दू टाईम्सचे ख्याल असर (मालेगावचे पत्रकार व स्तंभलेखक) उर्दू टाईम्सचे वार्ताहर आबिद अन्सारी धुळे आणि कवी देशमुख गुलाम हुसेन, सिल्लोड आदी उपस्थित राहणार आहे.
सेवानिवृत्त शिक्षक मुहम्मद इकबाल पटेल यांच्या नेतृत्वाखाली हाजी मुहम्मद निसार सेठ (एम. निसार अँड सन्स), पत्रकार व केके गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य अकील खान बियावली, कवी झाकीर हुसेन झाकीर भुसावळ,नौशाद हमीद, हाफिज शफीक रहमानी, हाफिज अब्दुल रहम पटेल, मुश्ताक भीश्ती , जियाउद्दीन बागबान, शकील खान अमान खान, तन्वीर पटेल, शोएब पटेल, तोसीफ पटेल, साकीब पटेल, इम्रान देशमुख, मोहसीन नौशाद आदींनी स्थानिक कवी, साहित्यिक, उर्दू वृत्तपत्रातील उर्दू रसिक, साहित्यिक मित्रांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.