समाज प्रबोधन करून संतांकडून मिळते योग्य दिशा

0
69

वाघोड येथील वारकरी मेळाव्यात संतांचे प्रतिपादन

साईमत/रावेर/प्रतिनिधी :

समाजाला योग्य दिशा आणि संस्कार संतच देत असतात. जेव्हा जेव्हा समाज भरकट असतो तेव्हा तेव्हा संत समाज प्रबोधन करून समाजाला योग्य दिशा देतात. धर्म आणि संस्कार टिकवण्याचे जबाबदारी सर्वांची आहे. राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्या जोडीने राष्ट्र मजबूत होऊ शकतो, असा सूर वारकरी मेळाव्यात संतांच्या मार्गदर्शनातून समोर आल्याचे भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ.केतकीताई पाटील यांनी सांगतले. ह.भ.प.संतोष महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वारकरी मेळावा, सद्गुरु श्री कुवरस्वामी वाघोड, ता. रावेर येथे आयोजित केला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.सुनील नेवे होते.

यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून ह.भ. प.सुभाष महाराज पातोंडी, ह. भ.प. दुर्गादास महाराज, ह.भ.प. कन्हैया महाराज, ह.भ. प.यादव महाराज विटवा, ह.भ.प. दीपक महाराज, ह.भ. प. नितीन महाराज खिर्डी, ह.भ. प.रामदास महाराज वाघोड, ह. भ. प. विनायक महाराज लोणी, ह.भ.प. रामदास महाराज वाघोड, ह.भ.प. पद्माकर महाराज, ह.भ.प. गणेश महाराज विटवा, प्रा. वि.ना. चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा भाजपा महिला मोर्चा जळगाव जिल्हा पूर्व, जळगाव जिल्हा पश्चिम आणि महानगर समन्वयिका डॉ.केतकीताई पाटील, भाजपा प्रदेश सदस्य सुरेश धनके, फैजपुरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, राजन लासुरकर, प्रल्हाद पाटील, कृष्णा पाटील, डॉ. जागृती फेगडे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी हिरालाल चौधरी, वासुदेव नरवाडे, विलास चौधरी, सुनील बारी, सुनील नेहते, पी.आर. चौधरी, अनंत पाटील, दिलीप महाजन, सुभाष महाजन, सुधाकर महाजन, ह.भ.प. धनु महाराज आदी उपस्थित होते. ह.भ. प. संतोष महाराज यांनी वाढदिवसानिमित्त वारकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यात जळगाव जिल्हा, बुलढाणा आणि परिसरातील वारकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here