Bus hits Omni on highway : महामार्गावर बसची ओमनीला धडक ; सुदैवाने प्रवासी बचावले

0
6

नशिराबाद पोलिसात बस चालकाविरुध्द गुन्हा दाखल

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील महामार्गावर भरधाव बसने ओमनीला जोरदार धडक देवून नुकसान केल्याची घटना गुरूवारी, १५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. सुदैवाने वाहनातील प्रवाशी थोडक्यात बचावले आहेत. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील माऊली पेट्रोल पंपाजवळ प्रवाशी चारचाकी वाहन ओमनी (क्र.एमएच १५ डीएम ६९५०) उभी होती. १५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव ते भुसावळ जाणारी बसवरील (क्र.एमएच ०६ एस ८५३४) चालक विजय शिवाजी पाटील (रा. खेडी, ता.जि.जळगाव) याने अंमली पदार्थ सेवन करून वाहन हयगयीने चालवून ओमनीला जोरदार धडक दिली. त्यात तिचे नुकसान झाले असून वाहनातील प्रवाशी थोडक्यात बचावले आहेत.

याप्रकरणी जळगाव बसस्थानक प्रमुख मनोज तिवारी यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. अतुल महाजन करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here