Nashirabad Toll Plaza : नशिराबाद टोल नाक्याजवळ अमळनेर आगाराच्या बसचा अपघात

0
11

महिला प्रवासी चाकाखाली चिरडून जागीच ठार

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

शहराजवळील नशिराबाद टोल नाक्याजवळ मंगळवारी, २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास झालेल्या बसच्या भीषण अपघातात महिला प्रवासी चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली आहे. ही घटना पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेमुळे नशिराबाद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, अमळनेर आगाराची बस जळगावकडून भुसावळकडे जात होती. तेव्हा अचानक बसच्या समोरील चाकांपैकी एक टायर फुटला. त्यामुळे बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून बस भरकटली आणि थेट टोल नाक्याजवळील भिंतीवर आदळली. धक्क्याने खिडकीत बसलेली एक महिला प्रवासी बाहेर फेकली गेली आणि ती बसच्या मागील चाकाखाली आली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत महिलेचे साराबाई गणेश भोई (वय ४६, रा. पाडळसा ता. यावल) असे नाव आहे.

पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात हलवला

अपघातानंतर स्थानिक नागरिकांसह टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. दरम्यान, नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात हलवला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here