Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Jalgaon:जळगाव शहरात घरफोडीची घटना; कोल्हे नगरातून ४० हजारांचा ऐवज लंपास
    क्राईम

    Jalgaon:जळगाव शहरात घरफोडीची घटना; कोल्हे नगरातून ४० हजारांचा ऐवज लंपास

    saimatBy saimatMarch 1, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: Burglary incident in Jalgaon city; Property worth Rs. 40 thousand stolen from Kolhe Nagar
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रकार उघड; सेवानिवृत्त नागरिकाचे घर लक्ष्य

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी

    शहरातील कोल्हे नगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४० हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी (दि. २८ फेब्रुवारी) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी दुपारी ४ वाजता रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुरलीधर नारायण धांडे (वय ७५) हे सेवानिवृत्त असून ते काही कारणास्तव घरी नसताना ही घटना घडली. २६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजेपासून ते २८ फेब्रुवारी २०२६ दरम्यानच्या कालावधीत चोरट्यांनी संधी साधली. घर बंद असल्याचे लक्षात येताच अज्ञात आरोपींनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

    घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी कपाटाचेही कुलूप फोडले. त्यामधील अंदाजे ४० हजार ४०० रुपये किमतीच्या चांदी व पितळी वस्तूंवर हात साफ करत ते पसार झाले. जवळपास दोन महिन्यांनंतर घर उघडल्यावर हा प्रकार समोर आला. चोरी झाल्याचे लक्षात येताच धांडे यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

    या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बंद घरे चोरट्यांच्या रडारवर असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल शरद वंजारी करीत आहेत.

    दरम्यान, नागरिकांनी घर दीर्घकाळासाठी बंद ठेवताना शेजाऱ्यांना कल्पना देणे, सीसीटीव्ही व्यवस्था ठेवणे व मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक असल्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Akulkheda (Tal. Chopra) :रागाच्या भरात प्रेयसीवर गोळी; नंतर प्रियकराची आत्महत्या

    March 1, 2026

    Jalgaon : मेहरूणमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना

    March 1, 2026

    Jalgaon:शनिपेठेत अतिक्रमणावर अखेर कारवाई; नगरसेवकांच्या हस्तक्षेपाने गल्ल्या मोकळ्या

    March 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.