Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»Bullet Train : मुंबईत बुलेट ट्रेन स्थानकांना मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी; प्रवाशांना ‘लास्ट माइल’ सुलभ
    मुंबई

    Bullet Train : मुंबईत बुलेट ट्रेन स्थानकांना मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी; प्रवाशांना ‘लास्ट माइल’ सुलभ

    saimatBy saimatMarch 18, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / मुंबई / प्रतिनिधी

    मुंबईत सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्थानकांना शहरातील विविध वाहतूक पर्यायांशी प्रभावीपणे जोडण्यावर भर देण्यात येत आहे. स्थानकांच्या परिसरात ‘स्टेशन प्लाझा’ विकसित करून प्रवाशांना बस, टॅक्सी, रिक्षा आणि इतर साधनांपर्यंत सहज पोहोचता येईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे.

    हाय-स्पीड रेल्वेला शहराच्या वाहतूक व्यवस्थेशी जोडण्यासाठी मल्टी-मोडल इंटिग्रेशन (MMI) प्रणाली राबवली जाणार असून, यामुळे प्रवाशांना स्थानकात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना कोणतीही अडचण येणार नाही. बुलेट ट्रेनमधून उतरल्यावर थेट स्टेशन प्लाझामधून पुढील प्रवासासाठी पर्याय उपलब्ध होणार असल्याने ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ अधिक सोपी होईल.

    स्टेशन प्लाझा हे सार्वजनिक जागेप्रमाणे विकसित करण्यात येणार असून, येथे पार्किंग, पिक-अप व ड्रॉप-ऑफ पॉईंट, पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग, आधुनिक प्रकाशयोजना, सीसीटीव्ही देखरेख आणि अग्निशमन सुविधा उपलब्ध असतील. यामुळे स्थानकांवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

    सध्या गुजरातमधील सुरत, बिलिमोरा, वापी, भरूच, आनंद आणि वडोदरा या स्थानकांवर स्टेशन प्लाझा उभारणीचे काम सुरू असून, पुढील टप्प्यात महाराष्ट्रातील ठाणे, बोईसर आणि विरार येथेही या सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.

    दरम्यान, देशातील पहिली बुलेट ट्रेन 15 ऑगस्ट 2027 रोजी सुरू होण्याची अपेक्षा असून, यामुळे मुंबई ते अहमदाबाद प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होऊन प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Government Alert : गॅस टंचाई टाळण्यासाठी सरकार सतर्क; शाळा-रुग्णालयांना १००% पुरवठा

    March 18, 2026

    Political : ‘राजकीय गणिते’ पुन्हा मांडणीवर; ठाकरे गटातील खासदार शिंदेंच्या संपर्कात?

    March 18, 2026

    Jalna Maharashtra : जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा; गहू उत्पादक शेतकरी चिंतेत

    March 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.