लोकसहभागातून उभारली कोतवाल दूध उत्पादक सहकारी संस्थेची इमारत

0
170

कुऱ्हा दूध डेअरीचे चेअरमन भगवान धांडे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

साईमत/ न्यूज नेटवर्क/ भुसावळ :

जिल्ह्यात कुऱ्हे पानाचे येथे चेअरमन भगवान धांडे यांच्या पुढाकारातून लोकसहभागातून दूध डेअरीची इमारत उभारण्यात आली आहे. याबद्दल जळगाव येथे दूध संघाच्या चेअरमन कार्यशाळेत संस्थेचे चेअरमन तथा माजी सरपंच हे भगवान धांडे यांचा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा दूध संघाचे ज्येष्ठ संचालक ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन, सचिव व संचालकांचे पालकमंत्री यांनी कौतुक केले. संस्थेने स्वतःच्या मालकीचा प्लॉट विकत घेऊन त्यावर लोकसहभागातून तालुक्यात उभारण्यात आलेली पहिली इमारत आहे.

लोकांच्या कल्याणासाठी लोकांनी एकत्र येवून केलेले कार्य म्हणजेच लोकसहभागातून विकास होय. ग्रामीण विकासात लोकसहभागाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कुऱ्हे पानाचे येथील दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन तथा माजी सरपंच भगवान धांडे दूध डेअरीची इमारत जास्तीत जास्त लोकसहभागातून उभी रहावी, यासाठी निश्चय केला होता. त्यानुसार स्वतः पुढाकार घेवून व देणगी देवून सुमारे ६-७ लाखाचा लोकसहभाग मिळविला. त्यात दूध डेअरीच्या बिल्डींग फंडच्या मदतीने ११ लाखांची दूध डेअरीच्या स्वमालकीच्या जागेत दूध उत्पादक संस्थेची इमारत उभी केली.

दूध उत्पादकांना वेळोवेळी मार्गदर्शन

तत्कालीन चेअरमन भुवन शिंदे यांच्या काळात संस्थेने जागा खरेदी केली होती. संस्थेच्या इमारत बांधकामासाठी लागणारे पाणी उन्हाळ्यामध्ये चेअरमन यांनी स्वतःच्या मालकीच्या टँकरने विनामूल्य पुरविले. त्याचप्रमाणे वेळोवेळी संस्थेस बांधकामासाठी चेअरमन यांनी अनामत देवून व संस्थेस सहकार्य केले. तालुक्यामध्ये अनेक खासगी व्यापारी व दूध डेअरी आहेत. तरीही कुऱ्हे येथील संस्था दर्जेदार दूध उत्पादनासाठी स्पर्धेत टिकून आहे. संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे दूध टेस्टिंगसाठी घेतलेले दूध उत्पादकांना परत करण्यात येते. तसेच दूध उत्पादकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते.

इमारत उभारणीसाठी यांची मिळाली खंबीर साथ

इमारत उभारणीसाठी भगवान धांडे यांना संस्थेचे संचालक भुवन शिंदे, सुरेश (अण्णा) शिंदे, सुलतान जाधव, सुनील धनगर, अरुण पाटील, मानसिंग जाधव, रवींद्र शिंदे, समाधान आठवले, दुर्गाबाई शिंदे, मीराबाई रंदाळे, सचिव सुनील जैन तसेच नुकतेच स्वर्गवासी झालेले रामधन महाजन, स्व. रमेश काशिनाथ पाटील यांची खंबीर साथ मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here