राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत गो.पु.पाटील विद्यालयाच्या स्वराज चौधरीस कांस्यपदक

0
31

साईमत, भडगाव : प्रतिनिधी

कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था, भडगाव, संचलीत गोपीचंद पुना पाटील, विद्यालय, कोळगाव, ता.भडगाव येथील दहावीचा विद्यार्थी व किसान स्पोर्ट्‌स अकॅडमीचा पहेलवान स्वराज प्रल्हाद चौधरी याने क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूरतर्फे कुरुंदवाड, जि.कोल्हापूर येथे आयोजित शालेय राज्यस्तरीय ग्रीकरोमन कुस्ती स्पर्धेत १७ वर्षाआतील ५५ किलो वजनी गटात तृतीय स्थान मिळवत कांस्यपदक मिळविले आहे.

स्वराजला सह्याद्री तालीम संकुल, पुणे येथील, वस्ताद विजय काका बऱ्हाटे, संजय कराळे, सयाजी मदने, कल्पेश कऱ्हाळे, प्रल्हाद चौधरी, प्रमोद थोरात, संदीप पठारे, निलेश पाटील, दिलीप पडवळ, संजय दाभाडे, म्हस्के आप्पा, पाटील सर, आकाश सोनवणे, साहिल संकपाळ, बी.डी.साळुंखे, प्रा.रघुनाथ पाटील, राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

स्वराजच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, सचिव डॉ.पूनम पाटील, मंत्रालयीन उपसचिव प्रशांतराव पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, पर्यवेक्षक अनिल पवार यांनी तसेच विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here