साईमत लाईव्ह उस्मानाबाद प्रतिनिधी
राज्य मार्ग 238 उस्मानाबाद ते उजनी या रस्त्याचे काम मागील जवळपास 3 वर्ष झाले चालू आहे सदरील काम संथ गतीने सुरू आसून त्यातील एकच बाजूचे काम झाले असून चालू असलेल्या कामात मानवी नित्ती मूल्याची पायमल्ली करून काम होत असल्याचे दिसून येत आहे. काम ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी सूचना फलक लावले नाहीत तसेच ज्या ठिकाणी पुल आहेत त्या ठिकाणी तर एकाच बाजूचे काम झाल्याने रात्रीच्या वेळेस दोन वाहने समोरासमोर आली असता सूचना फलकाच्या अभावामुळे पुलाचे कठडे दिसून न आल्याने अपघात होत असून यास जबाबदार कोण अशी चर्चा लोकामधून दबक्या आवाजात होताना दिसून येते तरी या ठिकाणी तरी तत्काळ सूचना फलक लावण्यात यावेत आणि त्या पुलावरील दोन्ही बाजूचा रस्ता पक्का करून वाहतुकीस सुव्यवस्थित स्थितीत सुरू करावा अशी मागणी जोर धरत आहे. या कडे शासनाने आणि प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून लोकांची होणारी हेळसांड थांबावावी.