समाजातील विवाहेच्छुक वधू-वरांनी ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी

0
52

श्री संत जगनाडे महाराज महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे आवाहन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी/

येथील श्री संत जगनाडे महाराज महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा रविवारी, २९ डिसेंबर रोजी आयोजित केला आहे. नोंदणी करण्यासाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर असणार आहे. विवाहेच्छुकांनी तात्काळ संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दरवर्षीप्रमाणे शारदा एज्युकेशनल फाउंडेशन आयोजित श्री संत जगनाडे महाराज महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा यंदाही मोठ्या उत्साहात घेण्यात येणार आहे. विवाहेच्छुक तरुणांनी, समाजबांधवांनी आतापर्यंत चांगला प्रतिसाद दिला असून नोंदणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तेली समाजाची वधू-वर परिचय पुस्तिका ही पूर्ण राज्यात व देशातील काही भागातदेखील वितरित होत असते.

अशा सूचीप्रमाणे अनेक तरुणांना आपला सुयोग्य जोडीदार निवडण्यास मदत होते. त्यासाठी सूचीच्या छपाईसाठी मजकूर संकलनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ज्या विवाहेच्छुक वधू-वर यांना सूचित नोंदणी करायची असेल त्यांनी तत्काळ श्री संत जगनाडे महाराज कार्यालय, नवीन सरस्वती डेअरीच्या समोर, नवी पेठ येथे संपर्क करावा, असे आवाहन अध्यक्ष प्रशांत सुरळकर (९९२२२२३८४४) यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here