चाळीसगावातील लाचखोर ग्रंथपाल एसीबीच्या जाळ्यात

0
37

चाळीसगाव : प्रतिनिधी
कालबध्द वेतनश्रेणी मंजूर करून आणण्यासाठी तडजोडीअंती सात हजारांची लाच स्वीकारताना चाळीसगाव तालुक्यातील करगाव माध्यमिक आश्रमशाळेचे ग्रंथपाल श्रीकांत गुलाब पवार (वय ३८) यांना जळगाव एसीबीच्या विभागाने लाच स्वीकारताच अटक केली. या कारवाईने शैक्षणिक वर्तुळातील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.
करगाव आश्रमशाळेचे ४१ वर्षीय कर्मचारी या प्रकरणात तक्रारदार आहेत. तक्रारदार यांची कालबध्द वेतनश्रेणी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग, जळगाव या कार्यालयाकडून मंजूर करून आणण्यासाठी यापूर्वी फोन पेवर पवार यांनी १५ हजारांची लाच स्वीकारली होती. त्यानंतर प्रादेशिक उपसंचालक इतर मागासवर्गीय विभाग नाशिक, येथून पदोन्नतीची थकीत रक्कम ८५ हजार ५१९ टक्केप्रमाणे १२ हजारांची लाच पवार यांनी मागितल्यानंतर त्यात तडजोड होवून सात हजार रुपये देण्याचे ठरले.
तक्रारदार यांना लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी तक्रार नोंदविताच सापळा रचून तो यशस्वी केला. हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे आणि पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, नाईक सुनील वानखेडे, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक किशोर महाजन,कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने यशस्वी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here