Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Forest Range Officer Trapped : लाच भोवली : वन परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात
    क्राईम

    Forest Range Officer Trapped : लाच भोवली : वन परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 6, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एसीबीच्या पथकाने तिघांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    बांबू लागवडीच्या परवानगीसाठी ३६ हजारांची लाच मागितल्या प्रकरणी वन परिक्षेत्र अधिकारी आणि त्यांचे दोन सहकारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकले आहे. त्यांना अटक केली असल्याचे संबंधितांनी सांगितले. कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही कारवाई एसीबीचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक हेमंत नागरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

    सविस्तर असे की, पारोळा तालुक्यातील सडावण येथे रहिवासी असणाऱ्या व्यक्तीला बांबू लागवड करायची होती. त्याच्या सोबत त्याच्या परिचयातील तिघे अशा चौघांना बांबू लागवडीची परवानगी हवी असल्याने त्यांनी सामाजिक वनीकरण खात्याच्या कार्यालयात संपर्क साधला. येथे आरएफओ मनोज कापुरे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. एका फाईलचे प्रत्येकी दहा हजार असे चार फाईल्सच्या चाळीस हजार रूपयांची लाच त्यांना मागण्यात आली. त्याअनुषंगाने संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. या तक्रारीची खातरजमा करून मंगळवारी, ६ ऑगस्ट रोजी सापळा रचण्यात आला.

    ३६ हजारांची लाच देण्यावर झाले एकमत

    तक्रारदाराने पुन्हा आरएफओ कापुरे यांच्याशी संवाद साधला. त्यात चर्चेअंती ३६ हजार रूपयांची लाच देण्यावर एकमत झाले. पंचासमक्ष हा प्रकार झाल्यानंतर लाच स्वीकारतांना त्यांना अटक केली. त्यात वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बबनराव कापुरे यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील लिपीक निलेश मोतीलाल चांदणे आणि कंत्राटी कर्मचारी कैलास भरत पाटील अशा तिघांना एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारतांना अटक केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.