जनजागृतीसह गरोदर, स्तनदा मातांना केले मार्गदर्शन
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील टाकळी बु. येथील अंगणवाडीत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त मार्गदर्शक मोहीम राबविण्यात आली. सुरुवातीला बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती सोनार यांनी सरस्वती मातेचे पूजन करून जनजागृतीसह मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात अंगणवाडी सेविका उज्ज्वला चौरे यांनी गरोदर महिला आणि स्तनदा मातांनी कशा पद्धतीने आहार घेतला पाहिजे, आपली शारीरिक प्रकृती यामुळे कशी सुंदर निकोप राहील, बाळाचे संगोपन कसे चांगले राहील, कोणत्या पदार्थांमध्ये कोणते विटामिन आहेत. स्तनपानामुळे बाळाला अतिसार होत नाही आदी विषयासंदर्भात महिलांना मार्गदर्शन केले. तसेच अंगणवाडी सेविका उज्ज्वला चवरे यांनी गरोदर, स्तनदा माता यांच्यासह इतर लाभार्थी मातांना मार्गदर्शन केले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी सुशिला महाजन, निर्मला महाजन, शेनफडाबाई सांडू मोरे, मंगला माळी, छाया जाधव, कोमल चवरे, भाग्यश्री दुसाने, विजया सपकाळ यांच्यासह मदतनीस, आशा स्वयंसेविका, अंगणवाडीशी निगडित गरोदर, स्तनदा माता, बालके उपस्थित होते.