Breaking : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी

0
5

मुंबई, वृत्तसंस्था । राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी करोनाचा शिरकाव झाला आहे. ‘शिवतीर्थ’वरील चार कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे राज ठाकरे यांनी आपल्या पुढील १० दिवसांतील कार्यक्रम आणि बैठका रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

राज ठाकरे एकाही सुनावणीला हजर राहिले नव्हते. जामीन देऊनही सतत तारखेला गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.

मुंबईतील लोकल ट्रेन इतक्यात बंद होणार नाही, पण नाईट कर्फ्यू, विकेंड लॉकडाऊनचा प्रस्ताव विचाराधीन: टोपे
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात बीडमधील परळी न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. २००८ साली राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. याप्रकरणात गुन्हा दाखल होऊन हे प्रकरण न्यायालयात गेले होते. यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांना अनेकदा न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु, राज ठाकरे एकाही सुनावणीला हजर राहिले नव्हते. जामीन देऊनही सतत तारखेला गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी करोनाचा शिरकाव झाला आहे. ‘शिवतीर्थ’वरील चार कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे राज ठाकरे यांनी आपल्या पुढील १० दिवसांतील कार्यक्रम आणि बैठका रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता राज ठाकरे न्यायालयाकडून सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी वेळ मागून घेणार का आणखी काही कायदेशीर मार्ग काढणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

गेल्या महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा झाला. या दौर्‍यात सुहास दाशरथे यांचं जिल्हाध्यक्षपद काढून घेतल्याने हा दौरा चांगलाच गाजला होता. पण आपलं पद काढले असले तरीही मी राज ठाकरेंचा सच्चा सैनिक असून, पुढेही कार्यकर्ता म्हणून मनसेचं काम करत राहील असे दाशरथे म्हणाले होते. पण बुधवारी मनसेकडून औरंगाबादमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनापासून दाशरथे यांनी लांब राहणे पसंत केले होते. त्यामुळे औरंगाबाद मनसेमध्ये गटबाजी सुरु असल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here