Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : महाशिवरात्री निमित्त जळगावात ब्रह्माकुमारीजचा भव्य उपक्रम
    जळगाव

    Jalgaon : महाशिवरात्री निमित्त जळगावात ब्रह्माकुमारीजचा भव्य उपक्रम

    saimatBy saimatFebruary 14, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: Grand event of Brahma Kumaris in Jalgaon on the occasion of Mahashivratri
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भारतातील बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडविणारी विशेष प्रदर्शनी उभारण्यात आली आहे.

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी

    महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या पार्श्वभूमीवर शहरात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्मिक ऊर्जेचा विलक्षण संगम अनुभवायला मिळत आहे. ब्रह्माकुमारीज संस्थेतर्फे प्रथमच भगवान महाकालेश्वर ज्योतिर्लिंग यांच्या स्मरणार्थ भव्य आणि प्रेरणादायी शिवलिंगाची प्रतिकृती उभारण्यात आली असून, या दिव्य दर्शन सोहळ्यामुळे जळगावकरांना आध्यात्मिक अनुभूतीची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे.

    रायसोनी स्कूलसमोरील बेंडाळे ग्राऊंड, पिंप्राळा रोड येथे सुमारे वीस हजार चौरस फुटांच्या विस्तीर्ण परिसरात ही भव्य ज्योतिर्लिंग प्रतिकृती साकारण्यात आली आहे. प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच भाविकांना शिवभक्तीने भारलेले वातावरण अनुभवायला मिळते. मंत्रोच्चार, शिवनामस्मरण आणि प्रसन्न सजावटीमुळे संपूर्ण परिसर शिवमय झाल्याची अनुभूती येते. जागृत शिवलिंगाची ही प्रतिकृती केवळ दर्शनापुरती मर्यादित नसून, भक्तांच्या आत्मिक उन्नतीसाठी विविध आध्यात्मिक उपक्रमांचीही प्रभावी मांडणी येथे करण्यात आली आहे.

    दर्शन स्थळी स्वतंत्र मेडिटेशन कक्ष, प्रवचन कक्ष आणि भारतातील बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडविणारी विशेष प्रदर्शनी उभारण्यात आली आहे. या प्रदर्शनीत महाकालेश्वर ज्योतिर्लिंगसह देशभरातील पवित्र ज्योतिर्लिंगांची माहिती दृश्यरूपाने सादर करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना एकाच ठिकाणी संपूर्ण ज्योतिर्लिंगांचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेण्याची संधी मिळत आहे.

    शिवतत्त्व, आत्मज्ञान आणि जीवनमूल्यांचा खरा अर्थ समजावा या उद्देशाने ‘शिवध्वज’ संकल्पनेवर आधारित विशेष प्रदर्शनी कक्ष तयार करण्यात आला आहे. चित्रे, प्रेरणादायी संदेश आणि आध्यात्मिक विचारांच्या माध्यमातून परमात्मा शिव यांचा सत्य परिचय करून देण्याचा प्रयत्न येथे केला जात आहे. विशेषतः तरुण पिढीला अध्यात्माकडे आकर्षित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सादरीकरण करण्यात आले आहे.

    या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन ब्रह्माकुमारीजच्या जळगाव सबझोन इन्चार्ज राजयोगिनी यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. शहरातील विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहत असून, जळगावकरांच्या आध्यात्मिक सेवेसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत हे दर्शन २० फेब्रुवारीपर्यंत सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले असून, महाशिवरात्री निमित्त जळगावात शिवभक्तीचा हा महासंगम विशेष आकर्षण ठरत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : साई गजानन रेसिडेन्सीतील १८ दुचाकी जळून खाक माथेफिरूच्या कृत्याचा संशय

    February 14, 2026

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Jalgaon : परीक्षेच्या काळात क्रिकेट लीगचा गोंगाट थांबवा

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.