पीआय भोळे यांच्यासह पीएसआय सुजित पाटील यांचे होतेय कौतुक
साईमत/बोदवड/प्रतिनिधी
बोदवड पोलीस स्टेशनकडील पीएसआय सुजित पाटील हे मॉर्निंग वॉक करत असताना बस स्थानक बोदवड येथे सुरक्षेच्या दृष्टीने फेरफटका मारत असताना दोन मुली तोंडाला स्कार्फ बांधून बसलेल्या दिसल्या. गर्दीतही सुजित पाटील यांच्या चाणाक्ष नजरेने ह्या मुली काहीतरी संशय निर्माण करणाऱ्या आहेत, हे ओळखले. सुजित पाटील यांनी मुलींची विचारपूस केल्यावर त्या मुली जामनेर तालुक्यातील बेटावद बु.येथील असल्याची माहिती समोर आली. सुजित पाटील यांनी मुलींना विश्वासात घेऊन अधिक माहिती विचारल्यावर मुली पालकांना न सांगता घरातून पळून आल्या होत्या.
भुसावळ येथुन दूर जाण्याच्या तयारीत होत्या. तेव्हा सुजित पाटील यांनी तत्काळ हा प्रकार पो.नि. श्री.भोळे यांना सांगितला त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुजित पाटील यांनी मुलींच्या पालकांसोबत संपर्क साधून मुलींना सुखरूप पालकांच्या ताब्यात दिले.
या प्रकरणातून बोदवड पोलीस स्टेशनचे सुजित पाटील यांच्या चाणाक्ष नजर व समाजाप्रती नैतिक जबाबदारी सिद्ध केली आहे. पंचक्रोशीत श्री.भोळे व सुजित पाटील तसेच बोदवड पोलीस स्टेशनचे महिला पोलीस रूपाली डांगे, पोलीस हवालदार मोनी पाटील, पोलीस हवालदार आयुब तडवी, पोलीस हवालदार संतोष चौधरी, पोलीस नाईक युनूस तडवी, पोलीस शिपाई माधव गोरेवार, विजय पाटील, प्रदीप चव्हाण यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.