साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव उर्वरित जिल्हास्तरीय जिल्हा असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय आट्यापाट्या १४, १७, १९ वर्ष आतील मुलींच्या स्पर्धा येथील छत्रपती क्रीडा संकुलात नुकत्याच उत्साहात पार पडल्या. याप्रसंगी १४ वर्षे आतील मुलींच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात धानोरा येथील झि.तो. महाजन माध्यमिक विद्यालय व नामदेवराव भावसिंग पाटील ज्युनिअर कॉलेजच्या संघाने बारी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली संघाचा ९ गुणांनी पराभव करत विभागीय स्तरावर मजल मारली आहे. तसेच १९ वर्षे आतील मुलींच्या संघाने अमळनेर संघाचा ८ गुणांनी पराभव करत विभागीय स्तरावर मजल गाठली आहे. १७ वर्षीय मुलींच्या संघाने तिसरा क्रमांक पटकाविला.
स्पर्धेचे उद्घाटन खानापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक हेमंत धांडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवा सेवा संचालनयाचे क्रीडा समन्वयक अनिल माकडे, कुरवेल हायस्कूलचे मुख्याध्यापक के.पी. बडगुजर, जे.डी.मोरे, क्रीडा शिक्षक वासुदेव महाजन, देविदास महाजन, आर.एम. पाटील, एस.ए.पाटील आदी उपस्थित होते.
यांनी केले कौतुक
विजयी संघाना क्रीडा शिक्षक वासुदेव महाजन, देविदास महाजन, अरुण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. दोन्ही संघाच्या विजयी खेळाडूंचे विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, शालेय समिती सदस्य बी.एस.महाजन, वामनराव महाजन, योगेश पाटील, सागर चौधरी, अनिल महाजन, व्ही.सी. पाटील, जगदीशकुमार पाटील, बाजीराव पाटील, सुखदेवराव पाटील, डॉ. रवींद्र चौधरी, पंकज महाजन, राजमल महाजन, उपमुख्याध्यापक मनोज चव्हाण, पर्यवेक्षक नवल महाजन, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.