तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत खर्डी विद्यालयाचे दोन्ही संघ विजयी

0
7

साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर

खर्डी येथील शारदा माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडांगणावर तालुकास्तरीय शासकीय खो-खो क्रीडा स्पर्धा नुकत्याच उत्साहात घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन अध्यक्ष एम.के.पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष ॲड. व्ही.बी.पाटील, मुख्याध्यापक बी.डी.पाटील, सी.एन.पाटील, एन.डी.घुगे, डी. आर. शिसोदिया, एल.डी. पाटील, एम.पी. सुरवाडे, चोपडा तालुका क्रीडा समन्वयक आर.पी. आल्हाट, तालुका क्रीडा अध्यक्ष अशोक साळुंके, चोतामा संचालक गुणवंत वाघ, शा.शि.सदस्य ललित सोनवणे, क्रीडा शिक्षक वासुदेव महाजन, अरुण पाटील, सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक देविलाल बाविस्कर, चोपडा तालुक्यातील सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेत १४ वर्ष, १७ वर्ष, १९ वर्ष आतील मुला-मुलींचे ४० संघ सहभागी झाले होते. त्यात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात १४ वर्षे आतील मुलींच्या सामन्यात शारदा माध्यमिक विद्यालय, खर्डी संघाने एक डाव राखत पंकज विद्यालय, चोपडा संघाचा पराभव केला. १७ वर्ष आतील मुलींच्या अत्यंत चुरशीच्या अंतीम सामान्यात शारदा माध्यमिक विद्यालयाच्या संघाने ओ.गो.पाटील माध्यमिक विद्यालय, बिडगाव संघावर ६ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. हे दोन्ही विजयी संघ जळगाव येथे होणाऱ्या जिल्हास्तरावरील सामन्यांसाठी पात्र ठरले आहेत.

यांनी घेतले परिश्रम

दोन्ही संघांना क्रीडा शिक्षक आर.टी.पाटील, किशोर राजकुळे, माजी खेळाडू यांचे मार्गदर्शन लाभले. सामन्यांसाठी पंच म्हणून वासुदेव महाजन, देविदास महाजन, एस.एस.चौधरी, आर.टी.पाटील, आर.एम.चौधरी, व्ही.पी.पाटील, जे.बी.जाधव, गुणवंत वाघ, ललित सोनवणे तर गुण लेखकसाठी अरुण पाटील, किशोर राजकुळे यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी सर्व खेळाडू, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. दोन्ही विजयी संघाचे विद्यालयाचे चेअरमन, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here