साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर
आकुलखेडा येथील पंडित जवाहरलाल नेहरु माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडांगणावर तालुकास्तरीय शासकीय खो-खो क्रीडा स्पर्धा नुकत्याच उत्साहात घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन शालेय समितीच्या सदस्या मनिषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चोपडा तालुका क्रीडा समन्वयक आर.पी.अल्हाट, तालुका क्रीडा अध्यक्ष अशोक साळुंके, चोतामा संचालक गुणवंत वाघ, शा.शि.सदस्य ललित सोनवणे, क्रीडा शिक्षक वासुदेव महाजन, अरुण पाटील, सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक देविलाल बाविस्कर, चोपडा तालुक्यातील सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेत १४ वर्ष, १७ वर्ष, १९ वर्ष आतील मुला-मुलींचे ४० संघ सहभागी झाले होते. त्यात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात १४ वर्षे आतील मुले सामन्यात झि.तो. महाजन माध्यमिक विद्यालयाने शारदा माध्यमिक विद्यालय खर्डीचा एक डाव राखत पराभव केला. १७ वर्ष आतील मुलांच्या अत्यंत चुरशीच्या अंतिम सामान्यात झि.तो.महाजन माध्यमिक विद्यालयाच्या संघाने विद्याभारती माध्यमिक विद्यालय, विरवाडे संघांवर एक डाव ५ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. हे दोन्ही विजयी संघ जळगाव येथे होणाऱ्या जिल्हास्तरावरील सामान्यांसाठी पात्र ठरले आहेत.
यांनी घेतले परिश्रम
दोन्ही संघांना क्रीडा शिक्षक वासुदेव महाजन, अरुण पाटील, माजी खेळाडू गौरव महाजन, नयन महाजन, भूषण गुजर यांचे मार्गदर्शन लाभले. सामन्यांसाठी पंच म्हणून देविदास महाजन, एस.एस.चौधरी, आर.टी.पाटील, आर.एम.चौधरी, व्ही.पी.पाटील, जे.बी.जाधव, गुणवंत वाघ, ललित सोनवणे तर गुण लेखकसाठी अरुण पाटील, किशोर राजकुळे यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी सर्व खेळाडू, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. दोन्ही विजयी संघाचा अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.