धानोरा विद्यालयातील मुलांचे दोन्ही संघ खो-खो स्पर्धेत विजयी

0
15

अनेक वर्षाची यशस्वी परंपरा, ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव

साईमत/धानोरा, ता. चोपडा/प्रतिनिधी :

येथील झि.तो.महाजन माध्यमिक व ना.भा.पाटील ज्युनिअर कॉलेज धानोरा विद्यालयाच्या क्रीडांगणावर तालुकास्तरीय शासकीय खो-खो मुलांच्या क्रीडा स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. खो-खो क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शालेय समितीचे सदस्य वामनराव महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, ज्येष्ठ संचालक बी. एस.महाजन, योगेश पाटील, चोपडा पंचायत समितीचे माजी उपसभापती माणिकचंद महाजन, सरपंच रज्जाक तडवी, पोलीस पाटील रवींद्र कोळी, उपमुख्याध्यापक नवल महाजन, चोपडा तालुका क्रीडासमन्वयक आर.पी.आल्हाट, चोतामाचे संचालक गुणवंत वाघ, एस.पी.महाजन, आर.टी.पाटील, जितेंद्र महाजन, जगदीश जाधव, बिडगावचे तलाठी अरविंद जाधव, ललित सोनवणे, विजय पाटील, स्वाती चौधरी, तालुकास्तरीय शासकीय स्पर्धा नियोजन समिती सदस्यांचा सत्कार क्रीडा शिक्षक देविदास महाजन, एस.एस.पाटील, एस.सी.पाटील, डिगंबर सोनवणे, मच्छिंद्र महाजन, भूपेंद्र परमार यांनी केला. यावेळी चोपडा तालुक्यातील सर्व शाळांचे क्रीडाशिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

चेअरमन प्रदीप महाजन यांनी मनोगतातून खेळांमधून उपलब्ध असलेल्या संधी व निरोगी सुदृढ शरीर रचनाविषयी मार्गदर्शन केले. राज्यस्तरीय खो-खो पंच देविदास महाजन यांनी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या प्रशिक्षण वर्गात घेतलेल्या प्रशिक्षणानुसार खेळातील नवीन बदललेले नियम, सांकेतिक खुणा पंचाच्या जबाबदाऱ्या, मैदान आखनीतील मध्यपाटीमधील बदलसारख्या अनेक बदलांची जाणीव खेळाडू व क्रीडा शिक्षकांना करून दिली.

तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेत १४ वर्ष, १७ वर्ष आतील मुलांचे २६ संघ सहभागी झाले होते. त्यात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात १४ वर्षे आतील मुले सामन्यात झि.तो. महाजन माध्यमिक विद्यालयाने शारदा माध्यमिक विद्यालय खर्डीचा एक डाव ३ गुणांनी पराभव केला. १७ वर्ष आतील मुलांच्या अत्यंत चुरशीच्या अंतीम सामन्यात झि.तो.महाजन माध्यमिक विद्यालयाच्या संघाने पुज्य सानेगुरुजी विद्यालय वडती संघांवर एक डाव ८ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. हे दोन्ही विजयी संघ जळगाव येथे होणाऱ्या जिल्हास्तरावरील सामान्यांसाठी पात्र ठरले आहेत. दोन्ही संघांना क्रीडा शिक्षक देविदास महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी दोन्ही संघ व क्रीडाशिक्षकांचे चेअरमन, शालेय समितीचे सर्व संचालक, क्रीडाप्रेमी, ग्रामस्थ, पालकांनी अभिनंदन केले.

यशस्वीतेसाठी पंच म्हणून भूषण गुजर, गौरव महाजन, नयन महाजन, अविनाश महाजन, दीपक साळुंखे, मिलिंद पाटील, सतीश कोळी, मोहित महाले, चेतन माळी, इमरान पिंजारी, अविनाश वानखेडे, रोहन पाटील, अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी सहकार्य केले. प्रास्ताविक चोपडा तालुका क्रीडा समन्वयक आर.पी.आल्हाट यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here