साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील बोरगाव येथील एका व्यापाऱ्याची दूचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनिवारी, १२ ऑगस्ट रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथील सचिन प्रभाकर पाटील (वय ४२) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. ११ ऑगस्ट रोजी त्यांनी त्यांची दूचाकी (क्र.एमएच १९ डीटी ४२०४) ही त्यांच्या घरासमोर पार्किंगला लावलेली होती. अज्ञात चोरट्याने रात्री १० वाजेच्या सुमारास ४५ हजार रूपये किंमतीची दूचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शनिवारी, १२ ऑगस्ट रोजी व्यापारी सचिन पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस नाईक प्रमोद पाटील करीत आहे.