Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Jalgaon : आव्हाणे रोडवर धाडसी चोरी; ‘नाईट किंग’ बारमधून विदेशी दारू लंपास
    क्राईम

    Jalgaon : आव्हाणे रोडवर धाडसी चोरी; ‘नाईट किंग’ बारमधून विदेशी दारू लंपास

    saimatBy saimatMarch 26, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दारूच्या बाटल्या गायब, लोखंडी ग्रील वाकवून चोरट्यांचा प्रवेश

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    शहरातील चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे स्पष्ट करत, चोरट्यांनी आता आपले लक्ष मद्यविक्री केंद्रांकडे वळवले आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आव्हाणे रोडवरील ‘हॉटेल न्यू नाईट किंग अँड वाईन पॅलेस’ या बिअर बारमध्ये मंगळवारी रात्री धाडसी चोरीची घटना घडली आहे.

    याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलचे मालक अमोल गोपाळ साळी (वय ३९, राहणार रा. राजराजेश्वरी अपार्टमेंट, जळगाव) यांचे बार मंगळवारी साडेअकरा वाजेपासून २५ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत बंद होते. या काळात अज्ञात चोरट्यांनी हॉटेलच्या खिडकीच्या लोखंडी ग्रीलला शिताफीने वाकवून आत प्रवेश केला.

    कोणाचेही लक्ष नसताना चोरट्यांनी काउंटर आणि स्टोअरमधून १५,८३० रुपये किमतीच्या विदेशी दारू आणि बिअरच्या बाटल्या लंपास केल्या. ही चोरी बुधवारी सकाळी ८ वाजता समोर आली.

    या घटनेनंतर अमोल साळी यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली असून, पोहेकॉ धनराज पाटील या तपास प्रकरणाची चौकशी करत आहेत.

    शहरात सतत वाढत चाललेल्या चोरीच्या घटनांमुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे, तर पोलीस प्रशासनाचे लक्ष या प्रकाराकडे वेधले गेले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Savda : सावदा सहकारी दुध संस्थेत विदेशी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

    March 26, 2026

    Bhusawal : सुनसगावातील कुत्र्यांच्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    March 26, 2026

    Kerosene Distribution : गॅसटंचाईवर उपाय! राज्य सरकारकडून घरगुती ग्राहकांसाठी रॉकेल वाटप सुरू

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.