Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पावसाळ्यात रोगराई टाळण्यासाठी पाणी उकळून प्यावे
    जळगाव

    पावसाळ्यात रोगराई टाळण्यासाठी पाणी उकळून प्यावे

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 19, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    पावसाळ्यात पाण्यामार्फत रोगराई पसरते. त्यामुळे घरी नळाद्वारे आलेले पिण्याचे पाणी उकळून प्यावे. पाणी व्यवस्थित झाकून ठेवावे की जेणेकरून रोगराई पसरणार नाही व रोगराईला आळा बसेल. याविषयीची जनजागृती व्हावी, या उद्देश्याने प्रगती विद्यामंदिर शाळेतील शिक्षक मनोज भालेराव यांनी सहावीच्या वर्गात स्तुत्य उपक्रम राबविला.

    पावसाळ्यातील भरलेल्या डबक्यातील पाणी घेतले. ते पाणी काचपट्टीवर घेऊन एक स्लाईड बनविली. तिला सूक्ष्मदर्शी खाली ठेऊन त्यात असलेले जिवाणू, विषाणू विद्यार्थ्यांना दाखविले. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना पाण्यात असलेले अमिबा, पॅरामेशिअम असे सुष्मजीवांची हालचाल होताना मायक्रोस्कोपच्या साहाय्याने दाखविण्यात आले. हे बघून विद्यार्थ्यांना आश्चर्यच वाटले. पाण्यात एवढे लहान लहान जीव असतात. त्यानंतर त्यांना पावसाळ्यात पाणी दूषित होत असते. हे दूषित झालेले पाणी जर का आपण तसेच प्यायले तर आपण आजारी पडू शकतो. यासाठी नेहमी पिण्याचे पाणी उकळून थंड करून गाळून घ्यावे. तसेच ते पाणी नीट झाकून ठेवावे. जेणे करून पाणी दूषित होणार नाही. यामुळे विद्यार्थ्यांना पाण्यातील असलेले सूक्ष्मजीवांची माहिती झाली. तसेच सूक्ष्मजीवांमुळे होणारी रोगराई याविषयी माहिती मिळाली. पाण्याला उकळून पिण्याचे फायदेही मनोज भालेराव यांनी समजावून सांगितले.

    उपयोजनात्मक उपक्रम

    उपक्रमाला विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल यांनी अतिशय उपयोजनात्मक उपक्रम असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षा मंगला दुनाखे यांनी उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिकविणे सोपे जाते, यासाठी उपक्रम घेणे महत्त्वाचे ठरते, असे सांगितले. याप्रसंगी मुख्याध्यापक संगीता गोहील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव महापालिकेत स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सभापती निवडीची अंतिम तयारी

    February 25, 2026

    Jalgaon : महापौरांचा आवाहन स्थानिक महिला बचत गटांना खरेदीद्वारे पाठबळ द्या!

    February 25, 2026

    Jalgaon: जळगाव जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंजूर; ५० कोटी ९७ लाखांचा विकासाचा दृष्टिकोन

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.