साईमत बोदवड प्रतिनिधी
बोदवड महाविद्यालयाचे ग्रंथपाल परिचर श्री.नामदेव बडगुजर नुकतेच सेवानिवृत्त झाले .त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन संस्थेचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्राचार्य अरविंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले . सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अध्यक्ष श्री. मिठूलालजी अग्रवाल, सचिव श्री. विकासभाऊ कोटेचा,अँड. श्री.प्रकाशचंद सुराणा,श्री. श्रीरामभाऊ बडगुजर, श्री.अशोक जैन ,श्री.रवींद्र माटे, नगरसेवक विजय बडगुजर ,प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी,उपप्राचार्य डॉ. विनोदकुमार चौधरी , माजी उपसरपंच संजय बडगुजर ,संजय मोहन बडगुजर यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री.नामदेव बडगुजर, त्यांच्या धर्मपत्नी सौ. रंजना बडगुजर यांचा संस्थेच्या वतीने आणि महाविद्यालयाच्या परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात डॉ. मनोज निकाळजे, श्री. शेखरसिंग चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. मिठूलाल अग्रवाल यांनी सत्कारमूर्ती नामदेव यांनी आपल्या कार्यकाळात अतिशय निष्ठेने ते काम केले असे गौरवोद्गार काढले . ज्येष्ठ संचालक ॲड. प्रकाशचंद सुराणा यांनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. पुस्तकांची बायडींग करून त्यांची काळजी व्यवस्थित घेत असत . वाचकांना हवे ते पुस्तक ते कमीत कमी वेळात शोधून देत असत .सर्व प्रकारची कामे केलीत असे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी सांगितले. ग्रंथपाल परिचर म्हणून जबाबदारी सांभाळत असतांना त्यांनी विद्यार्थी व सर्व कर्मचारीवर्गास नेहमीच सहकार्य केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य व्ही.पी. चौधरी ,सूत्रसंचालन डॉ. अजय पाटील, डॉ.अनिल बारी आणि आभारप्रदर्शन श्री. नरेंद्र जोशी यांनी केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे कार्यालय अधिक्षक बी. टी. हिवराळे व सर्व कर्मचारीवर्गाने परीश्रम घेतले असे प्रसिद्धीप्रमुख डॉ. रुपेश मोरे यांनी कळविले.