Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुक्ताईनगर»बोदवड शहराच्या पाणीपुरवठा योजनेला गती, स्थळ निरीक्षणासह मंत्र्यांच्या निवासस्थानी चर्चा
    मुक्ताईनगर

    बोदवड शहराच्या पाणीपुरवठा योजनेला गती, स्थळ निरीक्षणासह मंत्र्यांच्या निवासस्थानी चर्चा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 30, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

    मतदार संघातील बोदवड तालुका अवर्षण प्रवण क्षेत्र व दुष्काळी भाग असल्याने शहरातील नागरिकांना गेल्या स्वातंत्र्येत्तर काळापासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ही समस्या कायमची नष्ट व्हावी, यासाठी आ.चंद्रकांत पाटील यांचा शासन दरबारी युद्धपातळीवर पाठपुरावा सुरू आहे. आता या योजनेला गती मिळाली असून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी आ.चंद्रकांत पाटील, नाशिकचे मुख्य अभियंता भुजबळ, अधीक्षक अभियंता नरवाडे, मुख्याधिकारी गजानन तायडे, शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील, बोदवडचे नगराध्यक्ष आनंदा पाटील, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सईद बागवान तसेच संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा झाली.

    आगामी २५ ते ३० वर्ष लक्षात घेता योजना त्या स्वरूपात तयार व्हावी, मंजुरी मिळावी म्हणून तसेच प्रस्तावित योजनेत ज्या काही त्रुटी व तांत्रिक अडचणी होत्या. यासंदर्भात सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आमदारांनी केल्या. पालकमंत्र्यांनी आचारसंहिता काळात त्रुटी व अडचणी तसेच कागदपत्रांची पूर्तता करून योजनेला गती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करून संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केले. त्यामुळे योजनेला तातडीने वेग मिळून आचारसंहिता संपताच योजनेला मंजुरी मिळणार आहे. लगेचच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात होणार आहेे. आता बोदवडकरांची गेल्या अनेक वर्षापासूनची तहान आता भागणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे.

    शासन दरबारी अहवाल लवकर सादर करावा

    मंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर मुक्ताईनगर येथे बोदवड शहराच्या स्वतंत्र पाणीपुरवठ्याचा स्त्रोत तपासण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेवून आमदारांनी स्थळ निरीक्षण केले. बोदवड पाणीपुरवठा योजनेचा स्त्रोत हा तापी नदीच्याच पात्रातून घेण्यासंदर्भात अधिकारी वर्ग यांना पाहणी करून त्यासंदर्भातील अहवाल शासन दरबारी लवकरात लवकर सादर करावा, अशी सूचना केली. तसेच आमदारांनी सद्यस्थितीत मुक्ताईनगर व बोदवड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व नियमित व्हावा, यासंदर्भात चर्चा करून मुख्याधिकारी गजानन तायडे यांना सूचित केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर शेतकऱ्यांचा महामार्गावर उग्र रस्ता रोको आंदोलन

    February 3, 2026

    Muktainagar : प्रसादेश्वर शिवमंदिरातील चोरीप्रकरणी पोलिस निष्काळजीपणाने ग्रामस्थांमध्ये रोष

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.